शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पाच तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी

By admin | Updated: March 15, 2017 03:55 IST

अमरावती जिल्ह्यातील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळ आणि भक्तिधाम, श्री क्षेत्र रिद्धपूर, कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळ आणि भक्तिधाम, श्री क्षेत्र रिद्धपूर, कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र देवस्थान, वाशिम जिल्ह्यातील श्रीसंत सखाराम महाराज देवस्थान या पाच तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंजुरी दिली. या आराखड्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, बसस्थानक, जलपुनर्भरण आदी गोष्टींचा समावेश करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्यांद्री अतिथीगृहावर वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, आ.बच्चू कडू, आ.अमित झनक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील लोणी (ता. नांदगाव) येथील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळाच्या सोयीसुविधा व पायाभूत विकासासाठी ६.६९ कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. त्यात भक्तनिवास संकुल, स्वच्छतागृह, बहुउद्देशीय सभागृह/सत्संग भवन, श्री संत गुलाबराव महाराज यांचे जन्म मंदिर व श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराची सुधारणा व सुशोभिकरण, वाचनालय इमारत, पालखी मार्गाचे क्र ॉक्रि टीकरण आदींचा समावेश आहे.श्रीसंत गुलाबराव महाराज यांचे कर्मभूमी असलेल्या चांदूरबाजार तालुक्यातील प्रल्हादपूर येथील भक्तिधाम परिसराच्या विकासासाठी २४.९९ कोटी रु पयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये मुख्य मंदिर परिसराचे सुशोभीकरण, सांस्कृतिक भवन उभारणी, सायन्स सेंटर बांधणे, आर्ट गॅलरी, विश्रामगृह, जंतरमंतरच्या धर्तीवर बाग तसेच गौशाळा यांचा समावेश आहे.तर अमरावतील जिल्ह्यातील श्री क्षेत्र रिद्धपूर या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २५ कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये सिमेंटचे रस्ते व नाले, स्वच्छता गृह, थिम पार्क आदींचा समावेश आहे. प्रस्तावित थिम पार्कमध्ये सभागृह, बाग, पार्किंगची सोय, डायनिंग हॉल, बोटींगची सोय, बाजारतळ आदींचा समावेश आहे. तर वाशिम जिल्ह्यातील लोणी (ता. रिसोड) येथील श्रीसंत सखाराम महाराज संस्थान तीर्थक्षेत्र विकासासाठी २० कोटींच्या आराखड्यात मंदिराकडे जाणारे रस्ते, पालखी मार्ग यांची कामे, रस्त्याच्या कडील गावातील गटारींचे बांधकाम, सांडपाणी व्यवस्थापन, मंदिर परिसर व रस्त्यावर वीजेची सोय, भक्त निवास, प्रसाद साहित्य विक्रीसाठी दुकानांची उभारणी आदी कामे तसेच गावातील इतर रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. तसेच शौचालयाचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)