मालमत्ता विक्रीसाठी प्राधिकारी नियुक्त
By Admin | Updated: October 16, 2016 00:27 IST2016-10-16T00:27:37+5:302016-10-16T00:27:37+5:30
मैत्रेय कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने ४७ कोटींची मालमत्ता उघड केली. या संपत्तीची विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास

मालमत्ता विक्रीसाठी प्राधिकारी नियुक्त
अमरावती : मैत्रेय कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने ४७ कोटींची मालमत्ता उघड केली. या संपत्तीची विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले असून त्या आदेशाचे पत्र आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त झाले आहे.
अधिक पैशांचे प्रलोभन दाखवून ‘मैत्रेय’ कंपनीने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली. चौकशीदरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने मैत्रेयची ४७ कोटींची मालमत्ता उघड केली. सात बँक खात्यांतील ३७ लाखांची रक्कम सील केली. ४७ कोटींच्या स्थावर मालमत्तेची विक्री करण्यासाठी सक्षम प्राधिकारी नियुक्त करावा, असे प्रस्ताव आर्थिक गुन्हे शाखेकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले. मैत्रेयच्या अमरावती शहरातील मालमत्तेसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असून इतर जिल्ह्यातील जप्त मालमत्तेबाबत त्या जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)
मैत्रेय कंपनीच्या ४७ कोटींच्या मालमत्तेसंदर्भात सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे तसे आदेश प्राप्त झाले असून पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण करू.
- गणेश अणे, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अमरावती