मुंबई : केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन’ (आय.आय.एम.सी.) ही प्रसारमाध्यमांसंबंधीचे प्रशिक्षण देणारी अव्वल संस्था म्हणून सुपरिचित असून, या संस्थेचा मराठी पत्रकारितेसाठीचा पहिला पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम १ आॅगस्ट २०१७पासून अमरावती येथील पश्चिम प्रादेशिक केंद्रात सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमासाठीची अखिल भारतीय पातळीवरची प्रवेश परीक्षा २७ मे रोजी होईल. प्रवेशपरीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख १४ मे ही आहे. (प्रतिनिधी)
प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन
By admin | Updated: April 28, 2017 02:37 IST