शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

वाढवण विरोधी आंदोलकांत फाटाफूट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2017 3:25 AM

ओएनजीसीच्या सर्वेक्षणाला काही मच्छिमार छुप्या पद्धतीने सहकार्य करीत असल्याने ‘मच्छिमार एकजुटीला’ तडा जाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

हितेन नाईक,पालघर- मच्छिमारी व्यवसायाला उध्वस्त करायला निघालेल्या जिंदाल जेट्टी, वाढवणं बंदर, ओएनजीसीच्या सर्वेक्षणाला काही मच्छिमार छुप्या पद्धतीने सहकार्य करीत असल्याने ‘मच्छिमार एकजुटीला’ तडा जाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पैसे आणि आमिषे दाखवून मच्छीमारांच्या एकजुटीला पोखरले जात असल्याने संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी छुपे सहकार्य करणाऱ्या दांडेपाडा येथील एका मच्छीमारांच्या घराला गराडा घातला.वाढवण बंदर १९९८ साली उभारण्याच्या घाट घालण्यात आल्या नंतर ह्या बंदरा विरोधात ग्रामस्थांचा मोठा जनक्षोभ उसळल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विरोध आणि पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाच्या आदेशा नंतर हा प्रकल्प गुंडाळण्यात आला होता. मात्र भाजप-शिवसेनेची सत्ता आल्या नंतर पुन्हा हे बंदर उभारण्याची खुमखुमी अंगात शिरून कोणत्याही परिस्थितीत हे बंदर साकारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्या कडून केला जाऊ लागला. हे बंदर वाढवणं समोरील समुद्रात ४.५ नॉटिकल क्षेत्रात उभारले जाणार असून त्यासाठी लागणारा लोहमार्ग त्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या चौपदीकरणाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यामुळे समुद्रातील प्रदूषणासह मानवी वस्तीला मोठी हानी पोहोचणार आहे. त्यामुळे सागरी पर्यावरणासह आपले आयुष्य उद्ध्वस्थ करणाऱ्या या बंदराला सर्वस्तरावरून प्रखर विरोध होतो आहे. नांदगाव-आलेवाडी येथील जिंदाल समूहाच्या जेट्टी उभारणी मुळेही इथली निसर्ग संपदा आणि मत्स्य संवर्धनाचा हा गोल्डन बेल्ट नष्ट होणार आहे. या दोन्ही महाकाय प्रकल्पांमुळे होणारी प्रचंड हानी पाहता दिवसेंदिवस या विरोधात जनक्षोभ वाढत चालला आहे. तो शांत करण्यासाठी जेएनपीटी चे काही अधिकारी विकासाच्या आणि रोजगार निर्माण करण्याच्या नावा खाली विविध आमिषे स्थानिकांना दाखवीत असल्याचे निदर्शनास आले आहे. आम्ही आपल्या भागाचा विकास साधणार असून शाळा, मैदाने, रोजगार याबाबत विविध आमिषे दाखविली जात आहेत. त्यामुळेच डहाणू, पालघर तालुक्यातील ग्रामस्थ बैठकींना गैरहजर राहत आहेत. कारण अणुऊर्जा प्रकल्प, तारापूर एमआयडीसी उभारतांना स्थानिकांनी आपल्या जमिनी शासनाच्या हवाली केल्या. परंतु सरकारने कोणतेही आश्वासन पाळले नाही, भरपाई दिली नाही. त्यामुळे त्यांची वाताहत झाल्याने इथल्या स्थानिकांच्या मनात शासनाप्रति आता तसूभरही विश्वास उरलेला नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चेला साफ विरोध दर्शविला असल्याचे वरोरच्या नारायण विंदे ह्यांनी सांगितले.समुद्रातील सर्वेक्षणासह इतर कामाला मच्छीमारांच्या बोटी भाड्याने घेणे, समुद्रातील सर्वेक्षण, माती-खडक परीक्षण ह्याचे काँट्रॅक्ट देऊन मच्छीमारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.काही स्थानिक, राजकीय प्रतिनिधी, मच्छिमार नेते आदींना जेएनपीटी बंदराची वारी घडवून त्यांची फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये बडदास्त ठेवत आहेत. त्याद्वारे मच्छिमारांच्या एकजुटीला तोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याने लोकांमधून संताप व्यक्त होतो आहे. तारापूर एमआयडीसीच्या नवापूर गावातून व समुद्रातून जाणाऱ्या प्रदूषित पाण्याच्या ८.१ किमी लांब पाईप लाईनला वाढता विरोध असतांनाही त्याच गावातील काही मच्छीमारांच्या बोटीं सर्वेक्षणासाठी भाड्याने घेऊन तर काहींना विविध आमिषे दाखवून हा विरोध मोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर सातपाटी येथील काही मच्छिमार नेत्यांच्या बोटींचा वापरही ओएनजीसी सर्वेक्षणासाठी करीत असल्याचे दिसून येत आहे.वाढवणं बंदरा विरोधात दिवसेंदिवस जनक्षोभ वाढत असून स्थानिका मधून मोटार सायकल रॅलीद्वारे जनजागृती करुन जनमत तयार केले जात आहे. अशावेळी चिंचणी-दांडेपाडा येथील एका मच्छीमाराने आपल्या बोटी वाढवणं बंदराच्या सर्वेक्षण आणि अन्य परीक्षणासाठी भाड्याने दिल्याची माहिती कळल्या नंतर वाढवणं बंदर विरोधी कृती समिती अध्यक्ष नारायण पाटील, वैभव वझे यासह शेकडो स्थानिकांनी दांडेपाड्यातील प्रभाकर धानमेहेर यांच्या घरी जाऊन सर्वेक्षणा ला सहकार्य न करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी माझे मोठे आर्थिक नुकसान होण्याचे कारण देत या बोटींचा वापर थांबविण्यास नकार दिल्याने किनारपट्टीवरील गावात संतप्त वातावरण पसरले आहे. त्यामुळे काल वाढवणं, वरोर, चिंचणी, डहाणू ई. भागातील स्थानिकांनी भीक मांगो आंदोलन उभारून जमलेला पैसा धानमेहेर यांना देऊन सर्वेक्षण थांबविण्याची विनंती केली जाणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. >ही कीड वेळीच ठेचासामाजिक-संघटनात्मक आंदोलनाच्या एकजुटीला लागलेली ही कीड वेळीच ठेचली नाही तर त्याचे गंभीर परिणाम भविष्यात सगळ्यांनाच भोगावे लागतील म्हणून आताच आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे, अशी भावना या परीसरात व्यक्त केली जात आहे.सर्वेक्षणासाठी नौका पुरविण्याचे मला मिळालेले काँट्रॅक्ट मला कुणी येऊन काही सांगितले म्हणून मी रद्द करणार नाही. माझ्या मनाला गोष्टी पटल्या तरच मी तसा वागेन, माझा फायदा तोटा मला कळतो.-प्रभाकर धानमेहेर