काका-पुतण्याचे राजकीय युद्धाचे लोण आता औरंगाबादेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 11:12 AM2019-07-06T11:12:38+5:302019-07-06T12:38:58+5:30

वैजापूरमध्ये आजही राष्ट्रवादीचे पारड जड आहे. अभय पाटील हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. तसेच तालुक्यातील तरूण वर्ग त्यांचाशी जोडला गेलेला आहे.

Another uncle in the Maharashtra face to face | काका-पुतण्याचे राजकीय युद्धाचे लोण आता औरंगाबादेत

काका-पुतण्याचे राजकीय युद्धाचे लोण आता औरंगाबादेत

googlenewsNext

मुंबई – काका- पुतण्याचे राजकरण महाराष्ट्राला काही नवीन नाही. मग  राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार असो किंवा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे व विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे असो.  आता हेच काका-पुतण्याचे राजकीय युद्धाचे लोण औरंगाबादेत पोहचले आहे. वैजापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आणि त्यांचे पुतणे अभय पाटील चिकटगावकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी एकाच पक्षातून पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे या मतदार संघाची जिल्हाच्या राजकरणात चांगलीच चर्चा पहायला मिळत आहे.

ऑक्टोबर मध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहे. वैजापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे चांगल वजन आहे. २०१४ च्या मोदी लाटेत ही या मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी विजय मिळवला होता. या विजयाचे खरे शिल्पकार भाऊसाहेब यांचे बंधू व दिवंगत माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर यांना समजले जाते. मात्र आगामी विधानसभा निवडणूकीत कैलास पाटील यांचे पुत्र अभय पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी केली आहे. तर भाऊसाहेब यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज पक्षाकडे पाठवला आहे. त्यामुळे काका पुतण्याच्या शर्यतीत उमेदवारीचे झुकते माप कोणाच्या पारड्यात पडणार यांची उत्सुकता वैजापुरकरांना लागली आहे.

वैजापूरमध्ये आजही राष्ट्रवादीचे पारड जड आहे. अभय पाटील हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. तसेच तालुक्यातील तरूण वर्ग त्यांचाशी जोडला गेलेला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी तरुणांना येत्या विधानसभा निवडणूकीत संधी देणार असल्याची भुमिका स्पष्ट केल्याने अभय पाटील यांच्या समर्थकांना पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे येत्या काळात काका-पुतण्याच्या शर्यतीत कुणाला यश मिळणार हे पक्षाच्या भूमिकेवरच अवलंबून आहे.


 

Web Title: Another uncle in the Maharashtra face to face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.