शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका ओलेक्ट्रा ईलेक्ट्रीक बसचा भीषण अपघात; दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये बस स्थानकात घुसलेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 01:52 IST

Kurla Bus Accident: एसटी महामंडळ आणि बेस्टसह इतर महापालिकांच्या ताफ्यात ओलेक्ट्रा या कंपनीच्या ईलेक्ट्रीक बस आहेत. शनिवारी रात्री शिर्डीहुन नाशिकला जाणाऱ्या ईलेक्ट्रीक बसचा बस स्थानकावरच अपघात झाला होता.

बेस्टच्या ताफ्यातील ईलेक्ट्रीक बसचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईतील कुर्ला एल भागातील वर्दळीच्या रस्त्यावर रात्री पावणे दहाच्या सुमारास बेस्टच्या बसने भरधाव वेगात वाहनांना ठोकर देत जवळपास २५ लोकांना उडविले आहे. यामध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वीच या कंपनीच्या ईलेक्ट्रीक बसचा असाच अपघात झाला होता. 

एसटी महामंडळ आणि बेस्टसह इतर महापालिकांच्या ताफ्यात ओलेक्ट्रा या कंपनीच्या ईलेक्ट्रीक बस आहेत. शनिवारी रात्री शिर्डीहुन नाशिकला जाणाऱ्या ईलेक्ट्रीक बसचा बस स्थानकावरच अपघात झाला होता. बस नुकतीच स्थानकात फलाटावर आली होती. चालकाने लॉगशीटमध्ये एन्ट्री केली आणि त्याने पुन्हा बसमध्ये येत ती बस सुरु केली. यावेळी मोठा आवाज झाला व बस अचानक अनियंत्रित होऊन स्थानकात घुसली. यावेळी समोरून पतीसोबत जात असलेल्या एका भाविक महिलेचा बसची धडक बसल्याने मृत्यू झाला होता. 

कुर्ल्यात सोमवारी रात्री भरधाव वेगात बस गजबजलेल्या रस्त्यावर घुसली. यावेळी बसने सुमारे ३०० ते ४०० मीटर रस्त्यावर समोर जे येईल त्याला ठोकर दिली. या अपघातात बसने जवळपास २५ लोकांना उडविले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा चालकाने केला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय चाचणीदेखील करण्यात आली आहे. 

दरम्यान, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून चालकावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले आहे. तसेच रुग्णालयासह घटनास्थळी बघ्यांची गर्दी वाढत आहे. पोलिसांकडून नागरिकांना गर्दी कमी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या अपघातात पोलिस वाहनालाही  बस धडकली असून तीन पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. चालकाची चौकशी सुरु असल्याचे डीसीपीनी सांगितले आहे.

टॅग्स :AccidentअपघातBus DriverबसचालकKurlaकुर्लाNashikनाशिक