शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

शरद पवारांच्या गटातील आणखी एक आमदार अजित पवारांच्या गळाला? जिल्हा बँकेसाठी कायपण.... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 13:14 IST

अजित पवारांच्या शपथविधीला जे आमदार, खासदार गेले होते त्यांच्यापैकी काही आमदार, खासदार पुन्हा शरद पवारांसोबत गेले आहेत. तर शरद पवारांसोबत राहिलेले काही जण अजित पवारांच्या संपर्कात आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुकारलेले बंड आता निवडणूक आयोगात पोहोचले आहे. आता ते कधी सर्वोच्च न्यायालयात जाते हे काही सांगता येत नाहीय. अजित पवारांनीशरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांच्या शपथविधीला जे आमदार, खासदार गेले होते त्यांच्यापैकी काही आमदार, खासदार पुन्हा शरद पवारांसोबत गेले आहेत. तर शरद पवारांसोबत राहिलेले काही जण अजित पवारांच्या संपर्कात आहेत. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात शरद पवारांच्या गटातील आणखी एक आमदार अजित पवारांच्या गळाला लागल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी 2 जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, अजित पवार हे 3 वर्षात 3 वेळा उपमुख्यमंत्री बनले आहेत. संख्याबळाबाबत शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सामना रंगलाय. मात्र अजित पवार यांच्याकडे संख्याबळ जास्त आहे. दोन्ही गटांत एकमेकांना काढून टाकण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी पक्ष, चिन्हावर दावा करताना अजित पवार यांनी शरद पवारांच्याच अध्यक्षपदावरील निवड बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. तर शरद पवारांनी अजित पवारांसह नऊ मंत्री, तटकरे, पटेल यांना काढून टाकले आहे. आता ही लढाई आणखी पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

शरद पवार यांचे खंदे समर्थक असलेले माजी मंत्री बुलढाण्याचे सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हे देखील आता अजित पवारांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यातील त्यांच्या वडिलांनी, आईंनी आणि त्यांनी सुद्धा अध्यक्ष म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची असलेली जिल्हा सहकारी बँकचे कामकाज पाहिले आहे. या काळात ही जिल्हा सहकारी बँक अडचणीत आली होती. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नव्हते. मात्र मध्यंतरी विरोधीपक्षामध्ये असताना देवेंद्र फडणवीस साहेब, गडकरी साहेब यांनी या बँकेला मदत केली होती. सध्याही जिल्हा सहकारी बँकेची नाजूक परिस्थितीबाबतची ही गोष्ट अजितदादांना माहित होती.

अजित पवारांनी मला बोलवून सांगितलं की, तुम्ही माझ्या सोबत काम करण्याची भूमिका घेतली तर मी याच्यामध्ये पुढाकार घेऊन तुम्हाला मदत करू शकतो. त्यांनी तशी भुमिका माझ्यासमोर मांडली, त्यामुळे मी सुद्धा अलिकळडच्या काळामध्ये काल परवापासून अजितदादांच्या बरोबर आपण राहायला पाहिजे, बँक सुधारली पाहिजे, बँक पुढं गेली पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला काही जरी त्याग करावा लागला तरी ती करण्याची माझी तयारी आहे, या भूमिकेतून अजित दादांसोबत जाण्याचा माझा विचार करत आहे, असा  असा खुलासा शिंगणे यांनी केला आहे. यामुळे शिंगणे अजित पवार गटासोबत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षNCPराष्ट्रवादी काँग्रेस