‘स्वाइन फ्लू’चे आणखी दहा बळी
By Admin | Updated: March 16, 2015 02:25 IST2015-03-16T02:25:54+5:302015-03-16T02:25:54+5:30
राज्यात स्वाइन फ्लूने शनिवारी आणखी दहा जणांचा मृत्यू झाला. १ जानेवारीपासून या आजाराने बळी गेलेल्यांची संख्या २८८ झाली आहे

‘स्वाइन फ्लू’चे आणखी दहा बळी
पुणे : राज्यात स्वाइन फ्लूने शनिवारी आणखी दहा जणांचा मृत्यू झाला. १ जानेवारीपासून या आजाराने बळी गेलेल्यांची संख्या २८८ झाली आहे. राज्यात ३३ रुग्ण अत्यवस्थ असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. स्वाइन फ्लूचा विळखा घट्ट होत चालला असून राज्यात या आजाराचे दररोज किमान दहा जण बळी ठरत आहेत. शुक्रवारी १३ जणांना प्राण गमवावे लागले होते. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३,४०७ एवढी झाली असून आतापर्यंत २,३२९ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या ४४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १ जानेवारीपासून३ लाख १७ हजार १६८ फ्लू सदृश्य रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३२ हजार ६५४ संशयित रुग्णांना आॅसेलटॅमीवीर औषध देण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मृत्यू नागपूरमध्ये झाले झाले आहेत. त्याखालोखाल पुणे शहरात रुग्णांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)