मधुवंती दांडेकर यांना 'अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव' पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:51 PM2020-06-23T23:51:15+5:302020-06-24T12:23:50+5:30

गुलाबबाई संगमनेरकर यांना 'तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर'जीवनगौरव पुरस्कार 

Annasaheb Kirloskar Music Theater Lifetime Achievement Award to Madhuvanti Dandekar | मधुवंती दांडेकर यांना 'अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव' पुरस्कार

मधुवंती दांडेकर यांना 'अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव' पुरस्कार

googlenewsNext

पुणे : ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांना शासनातर्फे देण्यात येणारा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मंगळवारी (२३ जून) जाहीर झाला. 'तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार' ज्येष्ठ कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना देण्यात येणार आहे.

मधुवंती दांडेकर प्रदीर्घ काळापासून संगीत रंगभूमीवर कार्यरत आहेत. नाटककार विद्याधर गोखले यांच्या रंगशारदा संस्थेच्या ‘मंदारमाला’, ‘सुवर्णतुला’, ‘मदनाची मंजिरी’ आणि ‘ध्रुवतारा’ या अभिजात संगीत नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. 'मृच्छकटिक', 'संशयकल्लोळ', 'एकच प्याला', 'कृष्णार्जुनयुद्ध',

'झाला महार पंढरीनाथ', 'देव दीनाघरी धावला', 'मानापमान', 'सौभद्र' व 'स्वयंवर' अशा संगीत नाटकातून त्यांनी रंगभूमीची सेवा केली. त्या आजही संगीत रंगभूमीवर कार्यरत आहेत. 

 

संगमनेरकर यांनी वयाच्या नवव्या वर्षांपासून तमाशा क्षेत्रात काम करायला सुरुवात केली

त्यांनी कांताबाई सातारकर, तुकाराम खेडकर,  आनंदराव जळगावकर यांच्यासोबत काम केले. 'रज्जो' चित्रपटात त्यांनी काम केले. लता मंगशेकर यांच्या 'लताबाईंच्या आजोळची गाणी' या अल्बममध्ये त्यांनी काही गाण्यांवर अदाकारी सादर केली आहे. 'गाढवाचे लग्न' या वगनाट्यात त्यांनी काम केले आहे. मानपत्र, मानचिन्ह व पाच लाख रुपये असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे. 

-----

संगीत रंगभूमीचे आद्य नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या नावाचा पुरस्कार हा त्यांचा आशीर्वाद आहे, अशी भावना मधुवंती दांडेकर यांनी व्यक्त केली. माझे गुरु, कुटुंबीय आणि रसिकांचा यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. रंगशारदा संस्थेच्या ‘मंदारमाला’, ‘सुवर्णतुला’, ‘मदनाची मंजिरी’ आणि ‘ध्रुवतारा’ या अभिजात संगीत नाटकांमध्ये काम करण्यातून माझी कारकिर्द घडली, असेही त्यांनी सांगितले.

-----

संगीत रंगभूमीचे आद्य नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या नावाचा पुरस्कार हा त्यांचा आशीर्वाद आहे, अशी भावना मधुवंती दांडेकर यांनी व्यक्त केली. माझे गुरु, कुटुंबीय आणि रसिकांचा यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. रंगशारदा संस्थेच्या ‘मंदारमाला’, ‘सुवर्णतुला’, ‘मदनाची मंजिरी’ आणि ‘ध्रुवतारा’ या अभिजात संगीत नाटकांमध्ये काम करण्यातून माझी कारकीर्द घडली, असेही त्यांनी सांगितले.

........................

लोककला क्षेत्रामध्ये मी ज्यांना गुरुस्थानी मानले त्या विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झाल्याने मला खूप आनंद झाला आहे. सर्वांना धन्यवाद, अशी भावना गुलाबबाई संगमनेरकर यांनी व्यक्त केली. 

...........................................

Web Title: Annasaheb Kirloskar Music Theater Lifetime Achievement Award to Madhuvanti Dandekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.