शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

संघटन उभे न केल्याची अण्णांच्या मनाला सल

By admin | Updated: March 16, 2015 02:26 IST

अनेक वर्षांपासून दिल्ली येथील जंतरमंतर मैदानात आंदोलने केली. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, मी जर संघटन उभे केले असते,

पुणे : अनेक वर्षांपासून दिल्ली येथील जंतरमंतर मैदानात आंदोलने केली. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, मी जर संघटन उभे केले असते, तर त्याचा फायदा समाजहितासाठी झाला असता, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी व्यक्त केली. भूसंपादन विधेयकाविरोधातील हजारे यांच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे.स्वाभिमानी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचा समारोप महात्मा गांधी भवन येथे रविवारी झाला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेस स्वाभिमानीचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह अण्णा हजारे उपस्थित होते. यावेळी शेतकरी हिताचे विविध ठराव मंजूर करण्यात आले.केंद्रातील यापूर्वीचे सरकार किमान पत्राला उत्तरे देत होते. मात्र, केंद्रातील भाजपा सरकारबरोबर भूसंपादन कायद्यात बदल करण्यासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जनजागृतीसाठी वर्धा सेवाग्राम ते दिल्ली पदयात्रा काढण्यात येणार आहे, असे हजारे यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारकडून दंडुकशाही आणि षड्यंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्याचा अंदाज घेऊनच आंदोलन सुरू करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाच्याविरोधात हजारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा राहणार आहे, अशी भूमिका खा. राजू शेट्टी यांनी जाहीर केली. माजी कृषी पणन संचालक डॉ. सुभाष माने, समाजसेविका वर्षा काळे, उद्योजक कैलास वाणी यांनी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारला पाठिंबा दिलेला आहे. मात्र, सरकार चुकेल, त्यावेळी विरोध करणे हा आमचा नैतिक अधिकार आहे. सत्तेत असलो आणि नसलो तरी काही फरक पडणार नाही. आम्ही स्वत:हून महायुतीतून बाहेर पडणार नाही, पण आम्हाला सोबत घ्यायचे की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यावा, असेही शेट्टी म्हणाले.