शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

अण्णा हजारे यांना भेटण्यास मनाई; प्रकृती खालावली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 1:20 AM

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सात दिवसांच्या उपोषणात खालावलेली प्रकृती अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. गुरुवारी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सात दिवसांच्या उपोषणात खालावलेली प्रकृती अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. गुरुवारी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. गावात धार्मिक सप्ताह सुरू असल्याने रुग्णालयात दाखल होण्यास अण्णांनी नकार दिला आहे.जनलोकपाल नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत सात दिवस राळेगणसिद्धी येथे उपोषण केले होते. या उपोषणामुळे हजारे यांचे चार किलोंनी वजन घटले होते. ते सध्या दररोजच्या जेवणात पातळ पदार्थ घेत होते. प्रकृती पूर्वपदावर येईपर्यंत संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्लाही त्यांना डॉक्टरांनी दिला होता. उपोषण सुटल्यानंतर राज्यभरातील अभ्यागत अण्णांना भेटण्यासाठी राळेगणसिद्धीत येत आहेत. अभ्यागतांशी बोलावे लागत असल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. बुधवारी त्यांना जास्त त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्यांची दोनवेळा तपासणी केली. अण्णांना संपूर्ण विश्रांतीची गरज असून त्यासाठी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.राळेगणसिद्धीत सध्या धार्मिक सप्ताह सुरू असल्याने रुग्णालयात दाखल होण्यास अण्णांनी नकार दिला आहे. दरम्यान अण्णांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. त्यांना कोणीही भेटण्यास येऊ नये, असे आवाहन त्यांच्या कार्यालयाने केले आहे.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे