शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Anil Deshmukh, 100 crore extortion case: अनिल देशमुखांची जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 17:30 IST

११ नोव्हेंबरला होणार सुनावणी

Anil Deshmukh, 100 crore extortion case: १०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे त्यांची दिवाळी तुरुंगातच गेली. पण त्याचवेळी विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्या निर्णयाला आव्हान देत, त्यांनी मुंबईउच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या या याचिकेवर ११ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

विशेष सीबीआय न्यायालयाने भ्रष्टाचारप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील निकाल गुरुवारी राखून ठेवला होता. अनिल देशमुख व सीबीआयचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्जावर शुक्रवारी निर्णय देऊ, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे देशमुख यांची दिवाळी घरी की कारागृहातच साजरी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण शुक्रवारी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांची दिवाळी तुरूंगातच गेली. मात्र सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी त्यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका करण्यात आली आहे. त्यावर ११ तारखेला सुनावणी घेण्यात येईल.

राज्याचे गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी पदाचा गैरवापर करत भ्रष्टाचार केला व आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत सीबीआय व ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने देशमुख यांचा आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी जामीन मंजूर केला आणि सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मात्र गुरुवारी सीबीआयतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी युक्तिवाद पूर्ण केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर विशेष न्यायालयाचे न्या. एस. एच. ग्वालानी यांनी शुक्रवारी निकाल देऊ असे सांगितले. देशमुख यांना गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर रोजी ईडीने अटक केली होती.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAnil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभागMumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालय