शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरण : आरोपींना 12 दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 2:57 PM

प्रकरणाचा मुख्य सुत्रधार पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह पाच पोलीस व एक झिरो पोलीस या सर्वांना 12 दिवसांची पोलीस कोठडी

सांगली: लूटमारप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे या आरोपीचा सांगली पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह पाच पोलीस व एक झिरो पोलीस या सर्वांना आज सकाळी सांगली जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय युवराज कामटेंसह 5 जणांना बडतर्फ करणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली आहे.पोलीस कोठडीतून पलायन केल्याचा दावा केलेल्या अनिकेत अशोक कोथळे वय 26 या युवकाचा कोठडीतच खून करून त्याचा मृतदेह आंबोली घाटात  पोलीसांनीच जाळला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा खून पटविण्यासाठी कामटेंच्या पथकाने आरोपी पळून गेल्याचा बनाव रचण्यात आला, हेही आता स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कामटेंसह पाच पोलिस व एक झिरो पोलिस अशा सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना अटकही करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाबाबत माहिती दिली. सांगली पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या दरोड्यातील संशयित  आरोपी अनिकेत कोथळे याचा मृतदेह आंबोलीतील महादेवगड पाॅईट येथे रस्त्यापासून 42 मीटर अंतरावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता .तो मृतदेह सांगली पोलिसांचे विशेष पथक सीआयडी चे अधिकारी व सावंतवाडी न्यायालयाच्या उपस्थित घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बाहेर काढला.नांगरे-पाटील यांची पत्रकार परिषद -पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, सूरज मुल्ला, राहुल शिंगटे व झिरो पोलिस झाकीर अशी पथकातील अटक केलेल्या सहाजणांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध खून, पुरावा नष्ट करणे, शासकीय पदाचा गैरवापर करणे, आरोपींना मारण्यासाठी थर्डडिग्रीचा वापर करणे, असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हे प्रकरण सीआयडीकडे देण्यात येणार असल्याची माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.नांगरे-पाटील म्हणाले, कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड या अभियंत्यास चाकूच्या धाकाने लुबाडल्याप्रकरणी अनिकेत कोथळे व अमोल सुनील भंडारे (वय २३, रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) या दोघांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. कामटे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास होता. सोमवारी रात्री कामटे कामटेंच्या पथकाने पोलिस कोठडीतून कोथळे व भंडारेला चौकशीसाठी बाहेर काढले. त्यांना गुन्हे प्रगटीकरण (डीबी) शाखेत आणले. कोथळेला पंख्याला हुकाला उलटे टांगले. थर्डडिग्रीचा वापर करुन त्याला बेदम मारहाण केली. त्याचे डोके पाण्यात बुडवून ठेवले. प्रचंड मारहाण आणि डोके पाण्यात बुडविल्याने कोथळेचा डीबी रुममध्येच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सुनील भंडारे यांना पाहिला होता.दोनवेळा मृतदेह जाळलानांगरे-पाटील म्हणाले, मंगळवारी सकाळी दहा ते अकरा या वेळेत कामटेंच्या पथकाने कोथळेचा मृतदेह जाळला. पण तो व्यवस्थित जाळला नाही म्हणून पुन्हा पेट्रोल आणून हा मृतदेह जाळला. त्यानंतर कामटे यांचे पथक सायंकाळी सांगलीत दाखल झाले. कामटेंनी पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याशी संपर्क साधून पळालेल्या दोन आरोपीपैकी अमोल भंडारे यास मी स्वत: निपाणी (जि. बेळगाव) येथे पकडल्याचे सांगून स्वत:च्या कृत्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. सांगलीत जाळण्याचा बेत कामटे यांच्या पथकाने कोथळेचा मृतदेह सांगलीत जाळण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार कामटेने आणखी दोन लोकांना मदतीसाठी बोलावून घेतले. अमोल भंडारे हा या घटनेचा साक्षीदार असल्याने त्याला कामटेने सोबतच घेतले. भंडारेला मदतीसाठी आलेल्या दोन लोकांच्या ताब्यात दिले. त्यांना सांगलीत कृष्णा नदीच्या घाटावर बसण्यास सांगितले. रात्री बारापर्यंत भंडारे दोन लोकांसोबत घाटावर बसला होता, अशी माहिती नांगरे-पाटील यांना मिळाली आहे. त्याआधारे ते पुढील तपासाबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत.संतोष गायकवाड हे अभियंते मुंबईत नोकरीस आहेत. रविवारी पहाटे ते नांदणी (ता. शिरोळ) येथे सासरवाडीला जाण्यासाठी एसटीने सांगलीच्या मुख्य बसस्थानकावर आले होते. त्यावेळी संशयितांनी त्यांना चल भावा, तूला नांदणीला सोडतो, असे म्हणून दुचाकीवर बसविले. त्यांना कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राजवळ नेऊन चाकूचा धाक दाखवून दोन हजाराची रोकड व मोबाईल काढून घेतला होता.शहर पोलिसांनी या घटनेचा २४ तासात छडा लाऊन अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती. सोमवारी दुपारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.रात्री उशिरा या दोघांना चौकशीसाठी कोठडीतून बाहेर काढण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांना पोलिस ठाण्याच्या पायरीवर बसविले होते. पोलिस त्यांच्या कामात व्यस्त होते, याची संधी साधून हे दोघेही पोलिसांच्या हातावत तुरी देऊन पळून गेले, असा बनाव या पोलिसांनी रचला.रात्री साडेबारा वाजता पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे आरोपींची कोठडी तपासणीसाठी पोलिस ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी हे दोन्ही आरोपी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विचारणा केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर ड्युटीवरील पोलिसांना घाम फुटला. संशयितांच्या शोधासाठी शहर परिसरात पहाटे चार वाजेपर्यंत नाकाबंदी करण्यात आली होती.

टॅग्स :Aniket Kothale Murderअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणMurderखूनCrimeगुन्हाPoliceपोलिस