शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

... अन् देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन..! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 6:34 PM

तुम्हीच आमचे आजीव मुख्यमंत्री आहात, यापुढेही तुम्हीच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते..

ठळक मुद्दे''मोरया युथ फेस्टिवल २०२०'' चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते

पिंपरी : मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच त्याच विधानाचा पुनरुच्चार करून विधानसभा निवडणूक लढविली. निकालानंतर ते पुन्हा आले पण अल्पावधीतच त्यांचे सरकार कोसळले.. आणि महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करून फडणवीस यांचे मी पुन्हा येईन''चे स्वप्न वास्तविकदृष्ट्या भंग पावले. मात्र तरीही त्यांनी चिंचवड येथे एका कार्यक्रमात मी पुन्हा येईन, पण... असे म्हणून सर्वांचीच उत्सुकता वाढविली.चिंचवड येथे कर्तव्य फाउंडेशन आयोजित मोरया युथ फेस्टिवल २०२० चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी राजकारण विरहित विषयांवर आणि त्यांच्या विद्यार्थी दशेतील अनुभव यावर विद्यार्थ्यांशी  संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. 

कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पटवर्धन व अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने फडणवीस यांना प्रश्न विचारले. शालेय जीवन, खेळ, विद्यार्थीदशेतील गमतीजमती याबाबतच्या प्रश्नांनी त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. काही प्रश्नांना मिश्किलपणे उत्तरे देत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. काही विद्यार्थ्यांनीही त्यांना प्रश्न विचारले. तुम्हीच आमचे आजीव मुख्यमंत्री आहात, यापुढेही तुम्हीच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते, असे एक विद्यार्थी म्हणाला, तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचे मार्गदर्शन लाभले, ते यापुढेही लाभावे पुढच्या वेळी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून या कार्यक्रमाला यावे, असे एक विद्यार्थी म्हणाला. त्यावर फडणवीस म्हणाले, या वेळी फक्त इतकेच सांगतो की, मी पुन्हा येईन पण, या कार्यक्रमात...ह्ण त्यांच्या या उत्तराने प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना