Anant-Radhika Wedding: नवरदेव निघाला...अनंत अंबानींचा शाही थाट; वऱ्हाडींनी अडवली वाट, वाजतगाजत स्वारी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 17:41 IST2024-07-12T17:40:51+5:302024-07-12T17:41:18+5:30
Anant-Radhika Wedding: लगीनघटिका समीप आली! अनंत अंबानीचं वऱ्हाड निघालं, गाडीचाही शाही थाट

Anant-Radhika Wedding: नवरदेव निघाला...अनंत अंबानींचा शाही थाट; वऱ्हाडींनी अडवली वाट, वाजतगाजत स्वारी रवाना
Anant Ambani-Radhika Merchant wedding : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज विवाहबंधनात अडकणार आहेत. सर्वत्र अनंत अंबानींच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. अनंत-राधिकाच्या लग्नासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनंत-राधिकाच्या प्रीवेडिंग, आणि लग्नापूर्वीच्या विधींच्या फोटो आणि व्हिडिओंनी लक्ष वेधून घेतलं होतं. आता काहीच वेळात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
अनंत-राधिकाच्या लग्नासाठी वऱ्हाडदेखील निघालं आहे. अँटिलीयामधून एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये नवरदेवाची सजवलेली गाडी आणि वराती नाचताना दिसत आहेत. विरल भयानी या पापाराझी पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत नवरदेव अनंत अंबानीच्या गाडीला फुलांनी सजवल्याचं पाहायला मिळत आहे. मोगरा आणि गुलाबाच्या फुलांनी गाडीला शाही सजावट केली आहे. या कारच्या बोनेटवर फुलांनी स्वस्तिकही काढल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये ढोलच्या तालावर वराती नाचताना दिसत आहेत.
अनंत आणि राधिका यांचा शाही विवाहसोहळा जिओ सेंटर येथे पार पडणार आहे. त्यांच्या लग्नाला बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी असणार आहे. तर अनेक राजकीय नेतेही अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत. लग्नानंतर १४ आणि १५ जुलैला त्यांचं आशीर्वाद सेरेमनी आणि वेडिंग रिसेप्शन ठेवण्यात आलेलं आहे.