शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

‘सचिन’च्या भेटीतच होणार करोडपतीचा आनंद, ‘केबीसी’च्या २५ लाखांचे मानकरी राजूदास राठोड यांचे मनोगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 05:19 IST

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खेळाचा मी प्रचंड दर्दी आहे. सचिनची मॅच पाहता आली नाही म्हणून चार वेळा टीव्हीचा रिमोट वैतागून तोडला..

सतीश जोशीबीड : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खेळाचा मी प्रचंड दर्दी आहे. सचिनची मॅच पाहता आली नाही म्हणून चार वेळा टीव्हीचा रिमोट वैतागून तोडला. ‘कौन बनेगा करोडपती’ या प्रश्नमंजुषा मालिकेत सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नाला उत्तरे देत २५ लाख रुपये जिंकले. ‘याच कार्यक्रमामुळे जगद्विख्यात क्रिकेटपटू आणि माझा देव सचिन तेंडुलकर यांची भेट होणार आहे. मी तुला भेटणार आहे, यापुढे रिमोट तोडू नकोस, असे सचिनने टिष्ट्वटही केल्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे,’ असे मनोगत शिक्षक राजूदास माणिक राठोड यांनी व्यक्त केले.या मालिकेत २५ लाख रुपये जिंकून जिल्ह्याचा बहुमान वाढविल्याबद्दल बीड लोकमत कार्यालयातर्फे राठोड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ३५ वर्षे वयाचे आणि एम. ए. इंग्लिश शिक्षण पूर्ण झालेले राठोड हे वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंप्री जि.प. शाळेत शिक्षक आहेत. येथून जवळच असलेला हरिश्चंद्रपिंप्रीतांडा हे त्यांचे मूळ गाव. आई-वडील ऊसतोड कामगार. अशा परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मध्यंतरी काही वर्षे त्यांनी स्पर्धात्मक परीक्षादेत उच्च पदाच्या नोकरीसाठी प्रयत्न केला. परंतु आता ते शिक्षक पेशात रमले आहेत. आई, पत्नी आणि१२ वर्षांची एक मुलगी असा त्यांचा संसार. जीवनातील संघर्षाचीजाणीव ठेवून गेल्या वर्षभरापासून आपल्या तांड्यावरील ८ मुलांना दत्तक घेऊन त्यांना शिक्षणासाठी बीड येथे ठेवले.सोनी चॅनलनचे ३ आॅक्टोबर रोजी आपल्या जाहिरातीत ‘५० लाखांचा प्रश्न’ असे सांगून माझे नाव जाहीर केल्यामुळे ही माहिती सोशल मीडियावरून सर्वत्र ‘व्हायरल’ झाला आणि लोकांचे अभिनंदनाचे संदेश यायला लागले. बक्षीसापेक्षाही अमिताभ बच्चन यांच्याशी आपण संवाद साधतोय, हे आजही स्वप्नवत वाटत आहे. २५ लाखांपर्यंतच्या १२ प्रश्नांची उत्तरे मी आत्मविश्वासाने अचूक दिली. १३व्या प्रश्नाला उत्तर माहीत होते, परंतु समोरची मोठी रक्कम पाहून मन धजत नव्हते आणि मी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. ५० लाखांसाठींच्या १३व्या प्रश्नाचे उत्तरही माझे बरोबर आले होते, असे ते म्हणाले.सचिनच्या खेळावर मी खूप फिदा आहे. मला त्याची मॅच बघायची असायची आणि मुलीला कार्टून शो. बालहट्टापुढे मला अनेकदा नमते घ्यावे लागले आणि या रागात मी चारवेळा रिमोट तोडला. ही गोष्ट मी ‘हॉटसीट’वरून अमिताभ यांच्याशी शेअर केली, त्यामुळे सचिननेही टिष्ट्वट करताना ‘यापुढे रिमोट तोडू नकोस, मी तुला भेटणार आहे,’ असे सांगितल्यामुळे माझा आनंद करोडपती झाल्याइतपत द्विगुणित झाला. सचिन आॅक्टोबर २०१३मध्ये निवृत्त झाल्यानंतर तेव्हापासून मी क्रिकेट पाहणे देखील सोडून दिले, असेही राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडूलकर