शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

'मी पुन्हा येईन' ही घोषणा रोज व्हायला हवी, कारण...; अमृता फडणवीसांची शपथविधीनंतर प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 19:15 IST

Amruta Fadnavis on CM Devendra Fadnavis oath taking ceremony : देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्नी अमृता फडणवीस काय म्हणाल्या... वाचा सविस्तर

Amruta Fadnavis on CM Devendra Fadnavis oath taking ceremony : महाराष्ट्रातील राजकीय कोंडी फुटली आणि आज राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा जंगी शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. याशिवाय शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी या तिघांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुंबईतील आझाद मैदानावर हा भव्य-दिव्य सोहळा पार पडला. फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

"मला अत्यंत आनंद होत आहे की देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तसेच ते सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन हे लोककल्याणासाठी आणि समाजसेवेसाठी व्यतीत केले आहे. यापुढेही ते अशाच पद्धतीने धडाडीने काम करत राहतील. मी पुन्हा येईन ही एक लोकसेवेची घोषणा होती. ते दरवेळेला कामासाठी पुन्हा येत राहिले. काही वेळा पद असताना तर काही वेळा पद नसतानाही त्यांनी जनतेची सेवा केली. त्यामुळे मी पुन्हा येईन ही घोषणा दररोज झाली पाहिजे, कारण त्यामुळे आपला महाराष्ट्र सर्व क्षेत्रात नंबर वन होईल," अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, या समारंभाला सुरुवात होण्याआधीही अमृता फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. "जिद्द, चिकाटी आणि संयम यामुळे देवेंद्र फडणवीस आज इथे आहेत. आजचा दिवस खूप सुंदर आहे. लाडकी बहीण हा एक सुंदर प्रोजेक्ट आहे. देवेंद्रजी आणि महायुतीशी सर्व बहि‍णी प्रेमाने जोडल्या गेल्या. एखादी गोष्ट मिळावायची असेल तर आपल्याला समोर अर्जुनासारखं फक्त आपलं टार्गेट दिसायला हवं. गादीसाठी पुन्हा यायचं नाही. तर पुन्हा यासाठी यायचं होतं कारण त्यांना तसा विश्वास होता. लोकांना विश्वास होता की, ते महाराष्ट्रासाठी जे काही करू शकतील ते अजून कोणी करू शकत नाही. त्या विश्वासामुळेच ते पुन्हा आलेत याचा आनंद आहे," असे त्या म्हणाल्या होत्या.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmruta Fadnavisअमृता फडणवीसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahayutiमहायुती