शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

कन्येच्या गुणवाढ प्रकरणी अमरावतीचे कुलगुरू बचावले

By admin | Updated: June 8, 2014 00:57 IST

आपल्या कन्येच्या गुणवाढ प्रकरणात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मोहन खेडकर यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपातून परीक्षा मंडळाने त्यांना निर्दोष ठरविले आहे. हा निर्णय बहुमताने

लवकरच होणार रुजू : परीक्षा मंडळाचा अहवाल कुलपतींकडे सादरअमरावती : आपल्या कन्येच्या गुणवाढ प्रकरणात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मोहन खेडकर यांच्यावर ठेवण्यात आलेल्या  आरोपातून परीक्षा मंडळाने त्यांना निर्दोष ठरविले आहे. हा निर्णय बहुमताने  परीक्षा मडंळाच्या सभेत पारित झाला असून राजभवनाकडे मंजुरीकरिता  पाठविण्यात आला आहे. त्यामुळे मोहन खेडकर हे लवकरच सक्तीच्या रजेवरून परत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गेल्या काही  सहा  महिन्यांपासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मोहन खेडकर यांच्यावर याप्रकरणी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी  झडल्या. खेडकर यांची कन्या मृणाल हिने पेपर पुनर्मूल्यांकनाचेवेळी गुणवाढ केली व त्यासाठी कुलगुरुंनी तिला सहकार्य केले, असा आरोप त्यांच्यावर  लावण्यात आला होता. याकरिता अनेक सामाजिक संघटनांनी कुलगुरु चले जावचे नारे देत तीव्र आंदोलन केले. त्यामुळे  याप्रकरणाची चौकशी  करण्याकरिता सिनेट सभेने चौकशी समिती गठित केली होती. तसेच परीक्षा गैरव्यवहार चौकशी समिती ३२(६) बसविण्यात आली होती. मागील  सिनेट सभेत   चौकशी समितीने कुलगुरुविरोधात अहवाल  सादर केला होता; मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर ३२(६) कमिटीच्या अहवालाची  सर्वांंना प्रतीक्षा होती.  ३२(६) कमिटीचे अध्यक्ष संतोष ठाकरे यांनी हा अहवाल नुकताच सादर केला. त्यामध्ये तीन सदस्य कुलगुरु मोहन खेडकर यांच्या बाजूने तर दोन  सदस्य त्यांच्या विरोधात होते. या अहवालाला शुक्रवारी परीक्षा मडंळाच्या सभेत ठेवण्यात आले होते. मात्र त्यात अहवालाच्या बाजूने सहा तर विरोधात  चार सदस्यांनी आपले बयाण नोंदविल्याने कुलगुरु निर्दोष असल्याचा प्रस्ताव सभेत पारित करण्यात आला. हा प्रस्ताव कुलपतींकडे पाठविण्यात आला असून कुलगुरु मोहन खेडकर यांना रुजू करण्याचा निर्णय राजभवनातून लवकरच येणार असल्याची  माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)