शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

अमरावतीच्या कन्येने माऊंट किलिमंजारोवर रोवला राष्ट्रध्वज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 5:17 PM

प्रियंका ही नेहमी काहीतरी वेगळे करण्याची जिद्द बाळगणारी. यातूनच तिने हिमाचल प्रदेशातील नेहरू इन्स्टिट्यूट आॅफ माऊंटेनीअरिंगमधून रीतसर प्रशिक्षण घेतले.

अमरावती : विदर्भातील पहिली महिला वैमानिक अमरावतीची प्रियंका राजेश सोनी हिने बुधवार, ७ मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेच्या माऊंट किलिमंजारो शिखरावर भारताचा राष्ट्रध्वज रोवला. आठ दिवसांत सर्वांत कठीण मार्गाने १९ हजार ३४१ फूट उंचीचे जगातील चौथ्या क्रमांकाचे शिखर सर करून परतण्याचा गौरव तिने मिळविला आहे.प्रियंका ही नेहमी काहीतरी वेगळे करण्याची जिद्द बाळगणारी. यातूनच तिने हिमाचल प्रदेशातील नेहरू इन्स्टिट्यूट आॅफ माऊंटेनीअरिंगमधून रीतसर प्रशिक्षण घेतले. यानंतर हिमालयातील तिने माऊंट कमानो, हिमकुंड साहेब, मचहर, स्टॉक कांगरी ही शिखरे सर केली. यानंतर तिचे लक्ष्य होते माऊंट किलीमंजारो. दक्षिण  आफ्रि केतील हे शिखर सर्वोच्च सातपैकी चौथ्या क्रमांकावर असून, चहुबाजूंनी सुप्त ज्वालामुखींनी वेढलेला आहे. तिने निवडलेला मार्ग हा सरळसोट चढाईचा होता. त्यातच तापमान उणे २० ते ३० अंशाच्या आसपास तापमान होते. अशा स्थितीत आठ दिवसांत शिखराची चढाई करून परतण्याची किमया प्रियंकाने केली आहे. १ ते ७ मार्च दरम्यान ही गिर्यारोहण मोहीम आखली होती. यात सुमारे २५ देशांतील प्रतिनिधी सामील झाले होते. मात्र, थंड हवामानाचा धसका घेऊन अनेकांनी माघार घेतली. प्रियकांने मात्र त्याची तमा न बाळगता माऊंट किलीमंजारोवर भारताचा राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने रोवला.     प्रियंका ही इंडिगो एअरलाइन्समध्ये महिला वैमानिक म्हणून कार्यरत आहे. अमेरिकेच्या मियामी शहरात तिने वैमानिकांसाठी आवश्यक अभ्यासक्रम (सीपीएल) पूर्ण केला, तर जर्मनीच्या ब्रुसेल्स शहरातून एटीपीएल  मिळविले.

टॅग्स :Amravatiअमरावती