शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

खरीप कर्जवाटपात अमरावती जिल्हा माघारला; शेतकरी संकटात, बँकांचे असहकार्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 19:00 IST

पश्चिम विभागात यंदा ३० लाख हेक्टरमध्ये खरीप पेरणी झालेली आहे. त्यापूर्वी सोयाबीनचे उगवण नसलेल्या बियाण्यांमुळे शेतक-यांवर दुबार पेरणीची वेळ आली. कापसाचे चुकारे अद्यापही मिळालेले नाहीत.

ठळक मुद्देआर्थिक संकटात सापडलेला शेतकरी बँकाच्या चकरा मारत असताना त्यांना खरीप पीककर्ज मिळालेले नाही.

अमरावती : खरीप कर्जवाटपाच्या साडेचार महिन्यांनंतरही अमरावती विभागातील बँकांद्वारा लक्ष्यांकाच्या ५० टक्केही कर्जवाटप केलेले नाही. यामध्ये अमरावती जिल्हा सर्वात माघारला आहे. विशेष म्हणजे सर्वच जिल्ह्यात कर्जमाफीचा निधी उपलब्ध झालेला असताना शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया धिमी असल्यामुळे शेतकरी थकबाकीदार राहत आहे. त्यामुळे खरिपाचे कर्जवाटप माघारले आहे.पश्चिम विभागात यंदा ३० लाख हेक्टरमध्ये खरीप पेरणी झालेली आहे. त्यापूर्वी सोयाबीनचे उगवण नसलेल्या बियाण्यांमुळे शेतक-यांवर दुबार पेरणीची वेळ आली. कापसाचे चुकारे अद्यापही मिळालेले नाहीत.

आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी बँकाच्या चकरा मारत असताना त्यांना खरीप पीककर्ज मिळालेले नाही. नियमित कर्जदारांना प्रोत्साहन लाभ मिळेल, असे शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याने हे शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. त्यांना बँका कर्ज नाकारत असल्याचे चित्र विभागात दिसून येत आहे. विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या माहितीनुसार, जिल्हा सहकारी बँकांनी सद्यस्थितीत सर्वाधिक ६३.९० टक्के कर्जवाटप केले. यामध्ये बुलडाणा जिल्हा बँकेने लक्ष्यांक पूर्ती केली.

जिल्हा बँकाद्वारा २ लाख २० हजार ३१० शेतक-यांना १,४०६ कोटी २७ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातुलनेत राष्ट्रीयीकृत बँकांचे वाटप फक्त ३३.७४ टक्के आहे. या बँकांनी २ लाख १४ हजार ९१६ शेतक-यांना २०१५ कोटी ७५ लाखांचे वाटप केलेले आहे. ग्रामीण बँकांनी आतापर्यंत ४१.५६ टक्के वाटप केले आहे. या बँकांद्वारा विभागात ३९,८१४ शेतक-यांना ३८५ कोटी ३२ लाखांचे वाटप करण्यात आलेले आहे. 

 खरीप कर्जवाटपाची जिल्हानिहाय स्थिती (लाखांत) जिल्हा                लक्षांक          खातेदार            रक्कम             टक्केवारीअमरावती        १७२०००.००       ५८५७५           ५५५४३.१६       ३२.२९अकोला           ११४०००.००       ८२६१९            ६६६८०.४४       ५८.८३वाशिम             १५९९१२.००      ७७७१८           ५६२५१.६६         ३५.१८बुलडाणा         २४६०३५.००      ११२१५३           ८९३३१.७०         ३६.३१यवतमाळ         २१८२५२.००      १४३९७५          ११२९२८.८१       ५१.७४एकूण               ९१०१९९.००      ४७५०४०         ३८०७३५.७७       ४१.८३

 

आणखी बातम्या...

CoronaVirus News : नवनीत राणा नागपूरहून मुंबईला रवाना, पुढील उपचार लीलावती रुग्णालयात होणार

महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, सर्व पूल भक्कम - संजय राऊत

शरद पवार कुटुंबप्रमुख, प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार; पार्थ प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया    

‘मीच फक्त मॅच्युअर’ असा माझा दावा नाही - शौमिका महाडिक; शरद पवार यांच्या विधानावर टीका    

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय; मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार नोकरी    

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती