शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 12:51 IST

Ajit Pawar Rohit Pawar Amol Mitkari : अजित पवार-रोहित पवारांची कऱ्हाडमधील प्रीतीसंगमावर भेट झाली. यावेळी अजित पवारांनी केलेल्या मिश्किल वक्तव्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. त्यावर खोटारडा असं म्हणत अमोल मिटकरींनी टीका केली.

Ajit Pawar Rohit Pawar Amol Mitkari: 'थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर?', असं विधान अजित पवारांनीरोहित पवारांची भेट झाल्यानंतर केलं. त्यांच्या विधानावर राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली, तर रोहित पवारांनी ते बारामतीत अडकून पडले होते, असं म्हटलं. रोहित पवारांच्या या विधानावर अमोल मिटकरींना संतप्त प्रतिक्रिया दिली. रोहित पवारांना खोटारडा म्हणत त्यांनी उत्तर दिलं. 

कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (२५ नोव्हेंबर) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रीतीसंगमावरील यशवंतरावांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी आमदार रोहित पवार यांची त्यांच्याशी भेट झाली. भेट होताच रोहित पवार अजितदादांच्या पाया पडले. त्यावेळी 'थोडक्यात वाचलास माझी सभा झाली तर?', असं मिश्किल भाष्य अजित पवारांनी केलं. त्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर अमोल मिटकरींनी टीका केली.

अमोल मिटकरी रोहित पवारांना काय बोलले?

"स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीसमोर नतमस्तक झाल्यावर हा किती खोटा बोलतोय. बारामतीमध्ये पाय धरून काका माझ्या मतदारसंघात येऊ नका ही विनंती करुन आज मस्तीत बोलतोय. जय, पार्थदादापैकी कुणी एक जरी कर्जत जामखेडमध्ये फिरला असता, तरी याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता. खोटारडा", असे अमोल मिटकरी म्हणाले.

रोहित पवार नेमकं काय बोलले होते?

अजित पवारांची सभा झाली असती तर? या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार म्हणालेले की, "झाली असती, तर वर-खाली झालं असतं. उलटंही होऊ शकलं असतं. पण, बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते की, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. पण, शेवटी ते मोठे नेते आहेत. निर्णय त्यांचा होता. बाकी आज सगळ्यात जास्त आमदार त्यांचे निवडून आले आहेत. चांगली गोष्ट आहे. मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे."

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amol Mitkariअमोल मिटकरीRohit Pawarरोहित पवारAjit Pawarअजित पवारkarjat-jamkhed-acकर्जत-जामखेड