शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांना रिपाइं देणार सुरक्षा; नाना पटोलेंना रामदास आठवलेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 17:05 IST

काँग्रेस सरकार असताना पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यावर ट्विट करणारे अभिनेते अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. तसेच चित्रपटांचे शूटिंगही बंद पाडू, असा इशारा नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला होता. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना आता या वादात केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उडी घेतली आहे.

ठळक मुद्देलोकशाहीत अशी धमकी देणे चुकीचे - रामदास आठवलेअमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांना रिपाइं देणार सुरक्षाझुंडला लोकशाही पद्धतीने विरोध - नाना पटोले

मुंबई : काँग्रेस सरकार असताना पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यावर ट्विट करणारे अभिनेते अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. तसेच चित्रपटांचे शूटिंगही बंद पाडू, असा इशारा नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला होता. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना आता या वादात केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उडी घेतली आहे. ''काँग्रेस पक्ष या अभिनेत्यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न करेल, तर रिपब्लिकन पक्ष अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार या कलाकारांना संरक्षण देईल'', असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. (ramdas athawale slams nana patole over amitabh bachchan and akshay kumar statement) 

नाना पटोले (Nana Patole) यांच्या विधानाचा रामदास आठवले यांनी तीव्र विरोध केला आहे. बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रकरणाला बाधा आणणाऱ्यांना रोखण्याचे काम रिपब्लिकन पक्ष करेल, अशा इशारा रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना दिला. 

सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन, नानांच्या नाना तऱ्हा; भाजप नेत्याची टीका

लोकशाहीत अशी धमकी देणे चुकीचे

नाना पटोले आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. हिंदी मराठी चित्रपटसृष्टी ही मुंबईची शान आहे. सिने उद्योग हा मुंबईतील महत्वाचा उद्योग आहे. या उद्योगात अशी बाधा आणणे योग्य नाही. लोकशाहीत अशी धमकी देणे चुकीचे आहे. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण बंद पडण्याचा प्रयत्न केला तर वेळ पडली तर रिपब्लिकन पक्षाचे कर्तकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करतील, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला. 

झुंडला लोकशाही पद्धतीने विरोध

नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या झुंड चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांनी काम केले असून, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने विरोध करणार आहोत. जिथे जिथे चित्रपट प्रदर्शित होईल, तेथे काळे झेंडे दाखवून विरोध दर्शवण्यात येईल. कुठलेही सिनेमागृह बंद पडणार नाही. मात्र, बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा खरा चेहरा जनतेसमोर मांडण्याचे भूमिका आमची राहणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेRamdas Athawaleरामदास आठवलेAmitabh Bachchanअमिताभ बच्चनAkshay Kumarअक्षय कुमारcongressकाँग्रेस