भर पावसात अमित शहा, मुख्यमंत्र्यांचे रोड शोव्दारे जोरदार शक्तीप्रदर्शन

By Appasaheb.patil | Updated: September 1, 2019 19:55 IST2019-09-01T19:33:46+5:302019-09-01T19:55:24+5:30

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सोलापुरात दाखल; महाजनादेश यात्रेचा आज समारोप

Amit Shah, on the sidelines of the fall, showcased strong power through the Chief Minister's road show. | भर पावसात अमित शहा, मुख्यमंत्र्यांचे रोड शोव्दारे जोरदार शक्तीप्रदर्शन

भर पावसात अमित शहा, मुख्यमंत्र्यांचे रोड शोव्दारे जोरदार शक्तीप्रदर्शन

ठळक मुद्दे- मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा आज सोलापुरात समारोप- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती- पार्क मैदानावर होत असलेल्या सभेत हजारो कार्यकर्त्यांची गर्दी

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज सोलापुरात समारोप होणार आहे़ उस्मानाबादहुन निघालेली यात्रा रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोलापुरात दाखल झाली़ यात्रा दाखल होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुना पुणे नाका ते पार्क चौकापर्यंत रोड शोव्दारे जोरदार शक्तीप्रदर्शन केले़ या यात्रेचे जुना पुणे नाका येथे सोलापुरकरांनी जोरदार स्वागत केले.

या यात्रेत महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री आशिष शेलार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, खा़ रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खा़ जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी याच्यासह अन्य राज्यातील महत्वाचे मंत्रीगण व भाजपाचे केंद्रीय व प्रदेश पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते़ ही महाजनादेश यात्रा तुळजापूर नाका-पुना नाका-शिवाजी चौक-मेकॅनिक चौक-नवीवेस पोलीस चौकीमार्गे पार्क चौक येथे दाखल झाली़ पार्क येथे यात्रा दाखल झाल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा उस्मानाबादहुन सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सोलापूरकडे मार्गस्थ झाली होती़ तुळजापूर येथे स्वागत समारंभ व जाहीर सभा आटोपून ही यात्रा सोलापुरात दाखल झाली़ या यात्रेत सोलापुरकरांनी जोरदार स्वागत केले.


 

Web Title: Amit Shah, on the sidelines of the fall, showcased strong power through the Chief Minister's road show.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.