शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाहांनी टास्क फोर्स तयार करून ड्रग्स रॅकेड उद्ध्वस्त करावे, अजित पवार गटाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 13:38 IST

Amit Shah News: ड्रग्ज रॅकेटप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'टास्क फोर्स' निर्माण करून संपूर्ण देशभरातील ड्रग्ज माफियांचे हे रॅकेट उद्ध्वस्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

मुंबई - सध्या राज्यामध्ये ड्रग्ज आणि ड्रग्स रॅकेडचा मुद्दा गाजत आहे, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. ड्रग्ज रॅकेटप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'टास्क फोर्स' निर्माण करून संपूर्ण देशभरातील ड्रग्ज माफियांचे हे रॅकेट उद्ध्वस्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

देशाच्या केंद्रीय यंत्रणा ज्या पद्धतीने काम करतात त्यापलीकडे जाऊन ही 'टास्क फोर्स' यंत्रणा तयार करून तरुण पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या या ड्रग्ज रॅकेट माफियांवर कारवाई व्हायला हवी असं स्पष्ट मतही उमेश पाटील यांनी व्यक्त केलं.

कुणाच्या असण्याने अशा घटना घडतात असे होत नाही. अजितदादा पवार यांच्या कामाची कार्यशैली संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. अजितदादा पवार चुकीच्या कामाला कधीही पाठिशी घालत नाहीत. मागील ३५ वर्षाच्या सार्वजनिक जीवनात त्यांचा हा स्वभाव सर्वांना माहीत आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. जगभरातून आणि देशभरातील विद्यार्थी इथे शिकण्यासाठी येत असतात. शिक्षणाच्यादृष्टीने चांगल्या गोष्टी सांगता येत असल्या तरी त्यासोबत काही अपप्रवृत्ती देखील इथे घुसखोरी करून आलेल्या आहेत. ड्रग्जचा जो विळखा आहे तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. तरुणपिढी बरबाद होण्याच्या मार्गावर असल्याने हे रॅकेट पुण्यापर्यंत मर्यादित नाही, राज्यापुरतं नाही, देशभरापुरतं नाही तर ते आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे असेही उमेश पाटील म्हणाले.

त्यामुळे विरोधकांनी ड्रग्ज प्रकरणात राजकारण न करता या प्रश्नाकडे संवेदनशीलपणाने बघण्याची आवश्यकता आहे असे आवाहनही उमेश पाटील यांनी यावेळी केले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेस