अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:59 IST2025-08-30T18:58:58+5:302025-08-30T18:59:09+5:30
Amit Shah Mumbai Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते.

अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
Amit Shah Mumbai Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानात शनिवारी(दि.30) अचानक तांत्रिक बिघाड झाला. गृहमंत्री शाह दोन दिवसांचा मुंबई दौरा आटोपून गुजरातला रवाना होत असताना ही घटना घडली. विमानातील तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने पुढे आले अन् गृहमंत्र्यांना त्यांचे विमान उपलब्ध करून दिले. या विमानातून शाह सहकुटुंब गुजरातला रवाना झाले.
गृहमंत्री अमित शाह शनिवारी गणेशोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल. त्यानंतर त्यांनी कुटुंबासह प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीचे दर्शन घेतले. याशिवाय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेतली.
गणेश उत्सव में मुंबई के साथ ही पूरा महाराष्ट्र आस्था और हर्षोल्लास से भरा होता है। हर वर्ष की तरह इस वर्ष भी बांद्रा में सार्वजनिक गणेशोत्सव मंडल द्वारा स्थापित गणपति बाप्पा की भव्य मूर्ति के दर्शन करके सभी के कल्याण की प्रार्थना की।
— Amit Shah (@AmitShah) August 30, 2025
गणेशोत्सवात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र… pic.twitter.com/tv9wScBsWd
अमित शाहांनी आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहात शिंदे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरचिटणीस अतुल लिमये, महाराष्ट्र भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नवनियुक्त मुंबई भाजप प्रमुख अमित साटम यांच्याशीही चर्चा केली.
विनोद तावडे आणि अमित शाहांची भेट
दोन दिवसांच्या दौऱ्यात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीदेखील सह्याद्री अतिथीगृहात गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या या भेटीत आगामी उपराष्ट्रपती निवडणूक, बिहार विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे.