अंबादास दानवेंनी घेतली शरद पवारांची भेट; अर्धा तास खलबतं, तर्कवितर्कांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 05:35 IST2023-08-16T05:32:46+5:302023-08-16T05:35:30+5:30

महाविकास आघाडीबाबत विविध तर्कविर्तकांना उधाण आले आहे.

ambadas danve meet sharad pawar in chhatrapati sambhaji nagar | अंबादास दानवेंनी घेतली शरद पवारांची भेट; अर्धा तास खलबतं, तर्कवितर्कांना उधाण

अंबादास दानवेंनी घेतली शरद पवारांची भेट; अर्धा तास खलबतं, तर्कवितर्कांना उधाण

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्याच वेळी शरद पवार मंगळवारी दुपारी येथे आल्यानंतर त्यांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट घेतली आणि त्यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. 

दुपारी दोनच्या सुमारास शरद पवार यांचे येथे आगमन झाले.  त्यांची शहरातील एका हॉटेलवर पोहोचल्यानंतर दानवे यांनी भेट घेतली. पवार उद्या पळसखेडा येथे जाणार आहेत. दिवंगत ना. धों. महानोर यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेतील. 

दरम्यान, सोमवारी राष्ट्रवादी भवनात शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. त्यास आमदार रोहित पवार आणि दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी रोहित पाटील यांना माझा पाठिंबा राहील, असेही ते म्हणाले.

 

Web Title: ambadas danve meet sharad pawar in chhatrapati sambhaji nagar