शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाईच्या नित्य अलंकारांची स्वच्छता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 7:39 PM

कोल्हापूर, दि. 18 : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी करवीर निवासिनी अंबाबाईच्या जडावाच्या व सोन्याच्या नित्य अलंकारांची स्वच्छता करण्यात आली.  तहानभूक हरवून ...

कोल्हापूर, दि. 18 : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी करवीर निवासिनी अंबाबाईच्या जडावाच्या व सोन्याच्या नित्य अलंकारांची स्वच्छता करण्यात आली.  तहानभूक हरवून बघत राहावे असे हे अलंकार  शिलाहार, यादव, चंद्रहार , आदिलशाही,अशा विविध राजांच्या राजवटीत अंबाबाईला अर्पण करण्यात आले आहेत. अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडपात सकाळी ११ वाजता देवस्थान समितीचे पारंपारिक दागिन्यांचे हवालदार महेश खांडेकर यांच्या उपस्थितीत दागिन्यांच्या स्वच्छतेला प्रारंभ झाला. अंबाबाईचे किरीट, कुंडल, लप्पा, चिंचपेटी, सातपदरी कंठी, चारपदरी कंठी हे जडावाचे अलंकार आहेत. तसेच सोन्यात चंद्रहार, कुंडल, मोरपक्षी, लक्ष्मीहार, चाफेकळी, ठुशी, मोहनमाळ, बोरमाळ, तणमणी, मोहराची माळ, पुतळीहार, श्रीयंत्र, मंगळसूत्र, माणकाचे झुबे, कर्णफुले, कवड्यांची माळ, हे अलंकार आहेत.  या सर्व अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. यासह उत्सवमूर्तीच्याही दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये किरीट कुंडल, कोल्हापूरी साज, बोरमाळ, मोहनमाळ, मंगळसुत्र यांचा समावेश होता. धोंडिराम कवठेकर,संकेत पवार, गजानन कवठेकर, दीपक धोंड,  उदय लाड, शैलेश इंगवले, रमेश पोतदार, राजू निगडे, दिनेश सावंत यांनी दागिन्यांची स्वच्छता केली.

देवीच्या अलंकारांमध्ये कवडयाच्या दुर्मिळ माळेला मोठे महत्व आहे. याशिवाय पुतळ्याची माळ ही दरवर्षी वाढविली जाते. यात कर्नाटकातील तमन्नावर कुटूंबासह अन्य कुटूंबे यात सोन्याच्या पुतळ्या वाढवतात. गेली दहा पिढ्यांपासून आमचे कुटूंब अंबाबाई देवीच्या खजीन्यावर हवालदार म्हणून कार्यरत आहे.  सकाळपासून माझ्या देखरेखेखाली देवीच्या नित्य जडावाच्या दागिन्यांसह उत्सवमूर्तीचे दागिने पॉलिश केले. - महेश खांडेकर, हवालदार, अंबाबाई मंदीर 
टॅग्स :Navratriनवरात्री