शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

पूजेतून अंबाबाईचे ‘लक्ष्मी’करण

By admin | Updated: October 20, 2015 00:19 IST

भाविकांतून नाराजी : नवरात्रौत्सवात मूळ आदिशक्तीचे रूप दडपण्याचा जाणीवपूर्वक प्रकार

कोल्हापूर : शक्तिपीठ असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईच्या नवरात्रौत्सवातील रोजच्या पूजेत वैविध्य न ठेवता अंबाबाईची रोज अष्टलक्ष्मी पूजा बांधण्यात येत असल्याने भाविकांतून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच हा प्रकार जाणीवपूर्वक केला जात असल्याची प्रतिक्रियाही भाविकांतून उमटत आहे.गेली दोन वर्षे कोल्हापुरात अंबाबाई की लक्ष्मी? हा विषय गाजतोय. अंबाबाई ही लक्ष्मी नसून पार्वतीचे रूप आहे, हे जवळपास सर्वच कोल्हापूरकरांना माहीत झाले आहे. अनेक इतिहास संशोधकांनी याबाबत योग्य ते दाखलेही दिले आहेत. तरीही मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेदरम्यान मूळ मूर्तीतील नागचिन्ह घालवून तिचे रूप बदलण्याचा प्रयत्न केला गेला. शक्य असतानाही ते नागचिन्ह घडविण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यात नवरात्रौत्सवातील पूजेदरम्यान पुजाऱ्यांकडून अंबाबाईची दररोज अष्टलक्ष्मी रूपात पूजा बांधली जात आहे. या पूजांत कोणतेही वैविध्य जाणवत नाही. त्यामुळे हा जाणीवपूर्वकच अंबाबाईचे ‘लक्ष्मी’करण करण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया भाविकांतून उमटत आहे. अंबाबाईचे ‘लक्ष्मी’करण करण्याचा हेतू या पूजांमधून साध्य केला जात असून, आधीच नागचिन्ह व सिंह या मूर्तीवरून घालविले आहेत. आता देवीचे स्वरूपच बदलण्याचे षड्यंत्र आहे. याची दखल कोल्हापूरचे नेतृत्व करणाऱ्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. - इंद्रजित सावंत,इतिहास संशोधकअंबाबाई ही मुळात साडेतीन शक्तीपीठातील देवता आहे. नवरात्रौत्सव तिचा शक्तीचा जागर आहे. पण या कमळातील पूजा बांधून तिचे खरे स्वरूप झाकले जात आहे. या प्रकाराविरोधात आम्ही कायम लढत राहणार आहे. -वसंतराव मुळीक,अध्यक्ष, मराठा महासंघअंबाबाई विजयलक्ष्मी रुपातकोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला सोमवारी करवीरनिवासिनी अंबाबाईची विजयलक्ष्मी रूपातील पूजा बांधण्यात आली. तसेच जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीची अंबारीतील पूजा बांधण्यात आली. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता अंबाबाईचा शासकीय अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवीची श्री विजयलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. दिवसभरात विठू-माउली भजनी मंडळ, दत्तगुरू भजनी मंडळ इचलकरंजी, राधाकृष्ण भजनी मंडळ, दुर्गामाता सोंगी भजनी मंडळ, बिंदू राव, कोमल व्हटकर यांचे भरतनाट्यम्, सुप्रिया किरपेकर (कऱ्हाड) यांचे मंगळागौरीचे खेळ हे कार्यक्रम सादर झाले. रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी काढण्यात आली.आडमार्गाने व्हीआयपी प्रवेश सुरूचउच्च न्यायालयाने ‘व्हीआयपी’ दर्शनाला बंदी घातली असली तरी अंबाबाई मंदिरात तथाकथित व्हीआयपींना आडमार्गाने दर्शनासाठी सोडले जात आहे. यामुळे सर्वसामान्य भाविकांना मात्र पाच-सहा तास दर्शन रांगेत थांबावे लागते. या प्रकाराचा निषेध करत प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन दिले.