शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

पोक्सो, बलात्काराच्या गुन्ह्यातील डीएनए तपासणीतही सुस्तपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 11:39 IST

सध्याच्या घडीला ‘पोक्सो’संबंधी ११०६ तर महिलांवरील बलात्काराच्या गुन्ह्यांतील १०७५ डीएनएचे नमुने प्रलंबित आहेत. निर्भया अत्याचार  प्रकरणानंतर केंद्र सरकारने अल्पवयीन मुला-मुलींवरील अत्याचाराला प्रतिबंध करणारा (पोक्सो) कायदा लागू करीत स्वतंत्र शिक्षेची तरतूद केली.

जमीर काझी -

मुंबई : महिलांवरील  अत्याचाराच्या वाढत्या  घटनांला प्रतिबंधासाठी कठोर कारवाईची ग्वाही  राज्यकर्ते व  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. मात्र त्यासंबंधीच्या गुन्ह्याच्या तपासाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची बाब उपलब्ध आकडेवारीतून समोर येत आहे. बालकांवरील लैगिंक अत्याचार (पोक्सो) व महिलांवरील गुन्ह्यांसंबंधीच्या डीएनएचे शेकडो नमुने राज्यातील फॉरेन्सिक लॅबमध्ये चाचणीविना पडून आहेत. तंत्रज्ञानाच्या कमतरतेमुळे त्याकडे डोळेझाक झाल्याची परिस्थिती आहे.सध्याच्या घडीला ‘पोक्सो’संबंधी ११०६ तर महिलांवरील बलात्काराच्या गुन्ह्यांतील १०७५ डीएनएचे नमुने प्रलंबित आहेत. निर्भया अत्याचार  प्रकरणानंतर केंद्र सरकारने अल्पवयीन मुला-मुलींवरील अत्याचाराला प्रतिबंध करणारा (पोक्सो) कायदा लागू करीत स्वतंत्र शिक्षेची तरतूद केली. त्यासाठी आरोपीवरील गुन्हा सिद्ध होण्यासाठी संबंधितांच्या डीएनए चाचणीचा अहवाल आवश्यक लागतो, तसेच बलात्काराच्या गुन्ह्यात डीएनएची तपासणी आवश्यक असल्याने तो पोलिसांकडून फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला जातो. त्याची तपासणी अपुऱ्या मनुष्यबळामुळे रखडली असून जून २०२१ पर्यंत दोन्ही प्रकरणातील २१८१ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामध्ये पोक्सोच्या ११०६ तर बलात्काराच्या गुन्ह्यातील १०७५ प्रकरणे आहेत. 

शक्ती कायदा आणा पण!साकीनाका बलात्काराच्या घटनेने राज्य हादरून गेले. त्यानंतर राज्य सरकारने शक्ती कायदा विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र त्यापूर्वी पोक्सो व बलात्काराच्या गुन्ह्यातील डीएनएच्या अहवालांची पूर्तता त्वरित होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMolestationविनयभंग