शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांप्रति सरकार असंवेदनशील , अशोक चव्हाण यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 03:10 IST

शेतमालाला हमीभाव, भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आत्महत्या करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घ्यावी लागली. मात्र, तरीदेखील या असंवेदनशील सरकारला जाग आलेली नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.

जळगाव : शेतमालाला हमीभाव, भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आत्महत्या करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घ्यावी लागली. मात्र, तरीदेखील या असंवेदनशील सरकारला जाग आलेली नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी बुधवारी जळगावात काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘व्हीजन २०१९’ शिबिरात खा. चव्हाण बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके, भाई जगताप, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस आदी नेते मंडळी उपस्थित होती.जनतेचे प्रश्न सोडविण्यात केंद्र आणि राज्यातील सरकार अपयशी ठरले असल्यामुळे भावनिक व जातीय मुद्दे उपस्थित करून लोकांची मने विचलित करण्याचा प्रयत्न होत आहे. केंद्रातील मंत्रीच राज्यघटना बदलण्याची भाषा करू लागले आहेत. आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. भाववाढ अटळ असून, या इंधन दरवाढीविरुद्ध १६ फेब्रुवारीपासून राज्यव्यापी आंदोलन छेडू, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.साहेब, स्वबळावर लढा!स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी काँग्रेसने इतर पक्षाशी आघाडी केल्यामुळे कार्यकर्त्यांना संधी मिळालेली नाही. लोकांना ‘पंजा’चा विसर पडू नये, यासाठी तरी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्या, असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे धरला.बुलेट ट्रेन नको- पृथ्वीराजबुलेट ट्रेनचा निर्णय अव्यवहार्य असून, त्यावर होणारा भरमसाठ खर्च रेल्वेच्या इतर विकासासाठी खर्च केल्यास मोठा फायदा होऊ शकतो़ निविदा न काढता जपानला कंत्राट दिल्याने याची चौकशी व्हावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणFarmerशेतकरी