शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

पाकिस्तानकडून भारतातील सर्व स्त्रियांचा अवमान- अॅड. उज्ज्वल निकम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 1:50 PM

मिरज : कुलभूषण जाधव यांची आई व पत्नीच्या भेटीबाबत भारत सरकारचे चांगले पाऊल होते; मात्र पाकिस्तानने नेहमीचा कपटी पवित्रा घेतला. या भेटीतून दोन्ही देशादरम्यान चर्चा सुरू होईल, अशी आशा होती.

मिरज : कुलभूषण जाधव यांची आई व पत्नीच्या भेटीबाबत भारत सरकारचे चांगले पाऊल होते; मात्र पाकिस्तानने नेहमीचा कपटी पवित्रा घेतला. या भेटीतून दोन्ही देशादरम्यान चर्चा सुरू होईल, अशी आशा होती; मात्र पाकिस्तानने जाधव यांच्या आई व पत्नीचा अवमान करून संपूर्ण भारतातील स्त्रियांचा अवमान केला, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात नाट्य दिग्दर्शक डॉ. दयानंद नाईक यांनी घेतलेल्या मुलाखतीत अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. निकम म्हणाले की, पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नीचा अवमान करून संपूर्ण भारतातील स्त्रियांचा अवमान केला आहे. बुटात चिप आहे काय हे समजत नसलेल्या पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा भिकारी आहे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.व्यक्ती पाहिल्यानंतर तिची वृत्ती, प्रवृत्तीचा मी अंदाज बांधतो. आरोपीवर मानसिक प्रभाव टाकावा लागतो. अबू सालेम यास, मोनिका तुझ्यावर खरोखर प्रेम करीत होती का, बिगबॉसमध्ये दुस-यासोबत तिचे प्रेम प्रकरण सुरू आहे, असे मी म्हटल्यावर तो दुस-या दिवसापासून पाहा असे म्हणाला. दुस-या दिवसापासून बिग बॉसमध्ये मोनिका ही सहका-यासोबत चार हात लांब असल्याचे दिसले. यामुळे गुन्हेगारांचे हात किती लांब असतात, हे समजले. मुख्यमंत्री, राज्यपाल व हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या व्यक्तींसह मला देण्यात आलेली झेड प्लस सुरक्षा माझ्यासाठी भूषणावह नाही.आपण शास्त्र शाखेचे विद्यार्थी, वडील राजकारणी असताना राजकारणात न जाता वकील कसे झाला, या प्रश्नावर निकम म्हणाले की, वकील होण्याची माझी इच्छा नव्हती. लग्नाच्या बाजारात वकिलाची किंमत डाऊन आहे. काळ्याचे पांढरे, खºयाचे खोटे असा आभास निर्माण करणारा वकील असा त्याचा लौकिक आहे. आपल्या देशात या व्यवसायाकडे चांगल्या दृष्टीने पाहात नाहीत. परदेशात मात्र या व्यवसायाला प्रतिष्ठा आहे. देव, धर्म, योगावर विश्वास आहे का? या प्रश्नावर मी नास्तिक व आस्तिक दोन्हीही नाही, असे त्यांनी सांगितले.वकिली करीत असताना मला संतापाने कविता सूचत गेल्या. डोळे फाडून बघते ती बायको, जिच्यापुढे डाळ शिजत नाही, ती असते बायको, मला आठवे तारुण्याचे दिवस आगळे या कविता त्यांनी उपस्थितांना ऐकविल्या. एखाद्या खटल्याचा युक्तिवाद करताना संस्कृत या भाषेमुळे न्यायाधीशांवर प्रभाव पडतो. हा भाषेचा फायदा असल्याचे अ‍ॅड. निकम यांनी सांगितले.रस्ते का खराब?सांगली, मिरजेतील खराब रस्त्यांचा अ‍ॅड. निकम यांनी मुलाखतीत उल्लेख केला. सांगलीने राज्याला नेतृत्व व अनेक मुख्यमंत्री दिले; मात्र तरीही येथील रस्ते खराब का आहेत, हे माहीत नसल्याचे अ‍ॅड. निकम यांनी मिश्किलपणे सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली