शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

सर्व खासगी रुग्णालये यापुढे सरकारनेच चालवावी; इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 8:04 PM

हॉस्पिटल रजिस्ट्रेशनच्या प्रती करणार जमा

ठळक मुद्देआयएमएच्या सर्व सदस्यांनी नोंदणीच्या प्रती जाळल्या

पुणे : कोविड रुग्णालयांसाठी सरकारने सक्तीने लादलेल्या आणि न परवडणाऱ्या दरात, लघु आणि मध्यम आकाराची खासगी रुग्णालये चालवताना यापुढे दैनंदिन खर्च भागवणे दिवसेंदिवस अशक्य होत चालले आहे. आज (१५ सप्टेंबर) इंडियन मेडिकल असोसिएशनाच्या सदस्यांपैकी सर्व हॉस्पिटल मालक त्यांच्या हॉस्पिटल रजिस्ट्रेशनच्या प्रती आयएमए शाखा कार्यालयात जमा करणार आहेत. सरकारने सक्ती केलेल्या दरांसह रुग्णालये चालवणे त्यांना परवडणारे नाही आणि ही रुग्णालये सरकारनेच चालवावीत, असे आवाहन शासनाला केले जाणार आहे. स्वत: बनवलेल्या औषधाची चव सरकारने चाखलीच पाहिजे, अशी भूमिका इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतली आहे.आयएमएने १२ सप्टेंबर रोजी आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि दंतवैद्यकीय अशा सर्व पॅथींच्या २४ विविध वैद्यकीय संस्थांची बैठक बोलावली होती. सर्व संघटनांनी आयएमएच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून एकत्र काम करण्यासाठी संयुक्त कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सात दिवसांत सरकारने डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर बेमुदत काम बंद करतील, यावर या बैठकीत एकमत झाले.      सरकारने ३१ ऑगस्ट रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे नवे एकतर्फी दर लागू केले आणि आधीचे दर अधिक कडक केले. आयएमएने ४ सप्टेंबर रोजी राज्य पातळीवरील इमर्जन्सी स्टेट कौन्सिलच्या बैठकीत या अधिसूचनेचा निषेध केला आणि त्याविरोधात आंदोलन सुरू केले. आयएमएच्या सर्व २१६ शाखांनी ९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व हुतात्मा डॉक्टरांना श्रद्धांजली वाहिली आणि डॉक्टर रुग्णांना लुटत नाहीत तर तन,मन, धन आणि वेळप्रसंगी प्राणही वेचून रुग्णसेवा करत असल्याचे जनतेसमोर आणले. १० सप्टेंबर रोजी सर्व शाखांनी आंदोलनाची कारणे सर्व जिल्हा व तालुकास्तरीय सरकारी प्रशासकांना दिली. ११ सप्टेंबर रोजी सरकारी अधिकाऱ्यांच्या जुलमी वर्तनाचा निषेध म्हणून आयएमएच्या सर्व सदस्यांनी मेडिकल कौन्सिलच्या नोंदणीच्या प्रती महाराष्ट्रभरात जाळल्या.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर