'स्मार्ट सिटी' बाबत सर्व पक्षीय बैठकीस तयार - मुखयमंत्री

By admin | Published: December 14, 2015 06:21 PM2015-12-14T18:21:34+5:302015-12-14T18:30:40+5:30

स्मार्ट सिटी योजनेबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरले आहेत, ते दूर करण्यासाठी मी सर्वपक्षीय बैठकीस तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केलं.

All-party meeting on 'Smart City' - Chief Minister | 'स्मार्ट सिटी' बाबत सर्व पक्षीय बैठकीस तयार - मुखयमंत्री

'स्मार्ट सिटी' बाबत सर्व पक्षीय बैठकीस तयार - मुखयमंत्री

Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १४ - स्मार्ट सिटी योजनेबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरले असून ते दूर करण्यासाठी मी सर्वपक्षीय बैठकीस तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील हिवाळी आधिवेशनामध्ये विधानसभेत बोलताना स्पष्ट केलं. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच शहरांचा विकास करण्यासाठी त्यांना सुविधा पुरवण्यासाठी स्मार्ट सिटी योजना महत्त्वाची आहे, असे ते म्हणालेे. राज्यात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं आहे, त्यांना सुविधा देणं हा 'स्मार्ट सिटी' योजनेमागचा उद्देश आहे, असही त्यांनी सांगितलं. 
 
मुख्यमंत्र्याच्या भाषणातील ठळक मुद्दे
 
- 'स्मार्ट सिटी'तून महापालिकांचे अधिकार कमी करण्याचा इरादा नाही.
- 'स्मार्ट सिटी'तील शहरांची निवड करताना पारर्दशकता बाळगली आहे.
- शहरांना सुविधा पुरवण्यासाठी स्मार्ट सिटी योजना महत्त्वाची आहे.
- 'स्मार्ट सिटी'तील शहरांची निवड करताना पारर्दशकता बाळगली.
- समाजातल्या शेवटच्या माणसालासुध्दा सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजेत ही 'स्मार्ट सिटी'ची संकल्पना.
- शेतीवरचा भार करून उत्पादकता वाढवायची असेल तर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे आवश्यक आहे.

Web Title: All-party meeting on 'Smart City' - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.