शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यासोबत अख्खा गँगवॉर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2015 03:05 IST

पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला एका शिवसेना आमदाराने विक्रोळीच्या शाळेत अध्यक्षीय भाषणातून उधळलेल्या मुक्ताफळांची आॅडिओ

जयेश शिरसाट, मुंबईपन्नासाव्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला एका शिवसेना आमदाराने विक्रोळीच्या शाळेत अध्यक्षीय भाषणातून उधळलेल्या मुक्ताफळांची आॅडिओ क्लिप ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. या क्लिपनुसार ‘संपूर्ण गँगवॉर माझ्यासोबत आहे. हे गँगवॉर मी सोबत घेऊन फिरतो’, असा अभिमान शिवसेना आमदाराने व्यक्त केला आहे. आमदाराची ही वाक्ये कानावर पडल्यानंतर भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना जबर धक्का बसला. सुदैव इतकेच की त्या वेळी शाळेचा एकही विद्यार्थी या बैठकीला हजर नव्हता. विशेष म्हणजे जेव्हा याबाबत आमदार महोदयांशी ‘लोकमत’ने संपर्क साधला, तेव्हा ‘होय, ते मी बोललो’, असे अजब स्पष्टीकरणही त्यांनी दिले. हे ‘स्फूर्तिदायक’ भाषण दिले आहे भांडुपचे विद्यमान आमदार अशोक धर्मराज पाटील (५६) यांनी. विक्रोळी पश्चिमेकडील धर्मवीर संभाजी विद्यालयात १४ मार्च रोजी शिक्षक - संचालक यांच्यात सुसंवाद राहावा, या हेतूने आयोजित केलेल्या बैठकीत पाटील यांनी तब्बल अर्धा तास भाषण दिले. पाटील हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. या बैठकीला शाळेचे संचालक, मुख्याध्यापिका आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता. सुरुवातीला शिक्षकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्यानंतर पाटील भाषणाला उभे राहिले. त्यांनी या अडीअडचणींबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच शाळेत आर्थिक गैरव्यवहार खपवून घेणार नाही, अशीही तंबीदेखील दिली. मात्र त्यानंतर एका क्षणी त्यांचा ताबा सुटला.कुठे मर्डर, कुठे फायरिंग!समाजातल्या सर्व स्तरांत माझा मित्रपरिवार आहे. अगदी संपूर्ण गँगवॉरही माझ्यासोबत आहे. राजकारणात टिकून राहायचे असेल तर गँगवॉर सोबत घ्यावेच लागते. अनेक फोन येतात. आज कुठे मर्डर होणार आहे, उद्या कुठे फायरिंग होणार आहे... सर्वांना सोबत घेऊन पुढे गेलो म्हणूनच मला लाखो मते पडली. शिक्षक-कर्मचाऱ्यांसमोर शाळेमध्ये ही मुक्ताफळे उधळल्याने आमदार पाटील यांच्या भाषणाची ही आॅडिओ क्लिप सध्या भांडुपमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.होय, ‘ते’ मी बोललो !-होय, माझ्या भाषणात मी हा संदर्भ (अख्खा गँगवॉर माझ्यासोबत आहे.) दिला होता. पण तो चुकीच्या अर्थाने पसरवला जात आहे. गँगवॉरचे चांगले गुण किंवा चांगली बाजू मी घेत असतो, असे मला म्हणायचे होते, अशी प्रतिक्रिया आमदार अशोक पाटील यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.-मात्र आज कुठे मर्डर होणार, उद्या कुठे फायरिंग होणार, अशी माहिती देणारे फोन तुम्हाला येतात. या गंभीर गुन्ह्यांबाबत तुम्हाला आगाऊ माहिती असते का, असे ‘लोकमत’ने विचारले असता, पाटील म्हणाले, की मला तसे म्हणायचे नव्हते. हा संदर्भ मी नारायण राणेंसाठी वापरला होता. -राणे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा भांडुपमधून फक्त मीच त्यांना विरोध केला होता. त्यामुळे माझ्या सर्व गाड्या फोडण्यात आल्या होत्या. घरी धमकीचे फोन येत असत. फोन करणारे माझ्या पत्नीला ‘आज तुझे कुंकू पुस,’ अशा धमक्या देत होते. या धमक्यांबाबत मी तो संदर्भ वापरला होता, असा दावा पाटील यांनी केला.