प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : अवघ्या जगातील शांततेसाठी, प्रत्येक माणसाच्या सुखासाठी विश्वात्मकाकडे करण्यात आलेली मागणी अर्थात पसायदान! या विश्वप्रार्थनेचे सूर आता सर्व भारतीय भाषा आणि प्राचीन भाषांमध्येही निनादणार आहेत. यासाठी पसायदानाचा २५ भाषांमध्ये अनुवाद करण्यात येणार असून दृकश्राव्य माध्यमात गायनाचे चित्रिकरणही करण्यात येणार आहे.‘आता विश्वात्मके देवे! येणे वाग्यज्ञे तोषावे! तोषोनि मज द्यावे, पसायदान हे!’ हे पसायदानाचे सूर आजही शांतता आणि प्रसन्नतेचा संदेश देतात. तत्वज्ञान आणि काव्य यांचा मनोज्ञ संगम या विश्वप्रार्थनेमध्ये पहायला मिळतो. सरहद या संस्थेतर्फे वैश्विक शांततेचा संदेश देण्यासाठी पसायदानाचा २२ भारतीय भाषा, तसेच पाली, प्राकृत आणि अर्धमागधी या भाषांमध्ये अनुवाद करण्याचा निर्णय हाती घेण्यात आला आहे. एकीकडे देश दहशतवादाला, अस्वस्थतेला, अशांततेला सामोरा जात असताना समाजाला ‘तिमिरातूनी तेजाकडे’ नेण्यासाठी पसायदानाच्या अनुवादाची संकल्पना मूर्त रुपात साकारली जाणार आहे.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतशिरोमणी तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या पार्श्वभूमीवर शमीमा अख्तर या काश्मिरी तरुणीने मराठीमध्ये गायलेले पसायदान सर्वांनाच भावले. या अनोख्या प्रयोगाला उत्तम प्रतिसादही लाभला.
सर्व भारतीय भाषांमध्ये निनादणार पसायदानाचे सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 07:00 IST
‘आता विश्वात्मके देवे! येणे वाग्यज्ञे तोषावे! तोषोनि मज द्यावे, पसायदान हे!’ हे पसायदानाचे सूर आजही शांतता आणि प्रसन्नतेचा संदेश देतात...
सर्व भारतीय भाषांमध्ये निनादणार पसायदानाचे सूर
ठळक मुद्दे२२ भारतीय भाषा, तसेच पाली, प्राकृत आणि अर्धमागधी या भाषांमध्ये अनुवाद करण्याचा निर्णय