शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

व्यावसायिक अभ्यासक्रमांचे सर्व शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 19:59 IST

लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांकडून थकलेले शुल्क वसूल करण्यास मनाई

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे शुल्क, सीईटी परीक्षा, प्रवेश प्रक्रिया आदी मुद्द्यांवर चर्चा ‘असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अन एडेड इन्स्टिट्यूट इन एरिया’ या संघटनेतर्फे बैठक

पुणे: राज्यातील शैक्षणिक संस्थांना राज्य शासनाकडून आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांचे शुल्क वेळेत दिले जात नाही. त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थांनी 2020 - 21 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क आकारण्याचा निर्णय 'असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अन एडेड इन्स्टिट्यूट इन रुरल एरिया' या संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला . तसेच सीईटी परीक्षा रद्द करून व्यावसायिक अभ्यासक्रमास सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, अशीही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विद्यार्थी व संस्थांना येणाऱ्या अडचणींबाबत ‘असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अन एडेड इन्स्टिट्यूट इन एरिया’ या संघटनेतर्फे संस्थाचालक व प्राचार्य यांची झूम अ‍ॅपद्वारे बैठक घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांचे शुल्क, सीईटी परीक्षा, प्रवेश प्रक्रिया आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.  असोसिएशनचे अध्यक्ष रामदास झोळ म्हणाले, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न आकारता महाविद्यालयात प्रवेश दिला जातो. परंतु, या विद्यार्थ्यांचे शुल्क राज्य शासनातर्फे कधीही वेळेत दिले जात नाही. राज्य शासनाने शिक्षण संस्थांना 2019 - 20 व त्यापूवीर्ची थकलेली संपूर्ण रक्कम अदा करावी व पुढील वर्षाच्या प्रवेशाच्या वेळी 2013 च्या शासन निर्णयाप्रमाणे 90 टक्के उचल स्वरूपात रक्कम द्यावी. अन्यथा सर्व शिक्षण संस्थांकडून  2020 - 21 या वर्षातील प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क आकारले जाईल,असा निर्णय असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांकडून थकलेले शुल्क वसूल करण्यास मनाई करण्यात आली आहे.मात्र, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) व अखिल भारतीय औषध निर्माण शास्त्र परिषद यांनी सर्व प्राध्यापकांचे पगार वेळेत द्यावेत,असे आदेश दिले आहेत. परंतु, विना अनुदानित महाविद्यालयांकडे निधी नसल्यामुळे पगार देण्यात अडचणी येत आहेत. एआयसीटीईचे संचालक डॉ.अनिल सहस्रबुद्धे यांनी महाराष्ट्र शासनाला शैक्षणिक संस्थांच्या शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम देण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. परंतु ,याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत, असेही झोळ यांनी सांगितले.--------------साखर कारखान्यांनी सर्व शैक्षणिक संस्थांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या वेळी अधिवास प्रमाणपत्र देण्याची अट रद्द करण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांकडे काही कागदपत्र अपूर्ण असल्यास हमी पत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात यावा ,अशीही भूमिका असोसिएशनतर्फे यावेळी मांडण्यात आली.

-----------इयत्ता बारावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, कोरोनाच्या भीतीने विद्यार्थ्यांनी प्रवेश पूर्व परीक्षा (सीईटी) दिल्या नाही तर विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्य शासनाने सीईटी प्रवेश फेरी शिवाय किंवा समुपदेशन फेरीमध्ये सीईटीचे विद्यार्थी संपल्यानंतर सीईटी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मान्यता द्यावी,अशी मागणी असोसिएशन तर्फे करण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस