शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी चालकाने केला पोलिसांवर हल्ला

By admin | Updated: September 26, 2016 20:51 IST

कोम्बिंग आॅपरेशनदरम्यान ३६ वर्षीय मद्यपी कारचालकाने पोलिसाला मारहाण केल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास कफपरेडमध्ये घडली.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 26 - हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरू असलेल्या कोम्बिंग आॅपरेशनदरम्यान ३६ वर्षीय मद्यपी कारचालकाने पोलिसाला मारहाण केल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास कफपरेडमध्ये घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी दीपककुमार बनवारीलाल याला कफपरेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बनवारीलाल याचे वडील नेवीमधून निवृत्त झाले आहेत. कफपरेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीतानगर परिसरात बनवारीलाल पत्नी आणि मुलीसोबत राहतो. त्याचे वडील नेवीतून निवृत्त झाले आहेत. त्याने स्वत:ची हुंदाई कार (क्रमांक एम.एच ०१, सी-जे ०१७९) ओलासाठी लावली होती. रविवारी रात्रीपासून कफपरेड येथील गणेश मूर्ती नगर परिसरात कफपरेड पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन दरम्यान नाकाबंदी सुरू होती. यावेळी पोलीस निरीक्षक रावसाहेब वैद्य, एपीआय पवार, पीएसआय घेवडेकर, पी. शिंदे यांच्यासह दोन महिला अंमलदारांसह आठ जण तपासणी करत होते. दरम्यान दारूच्या नशेत कारमधून भरधाव वेगाने येत असलेल्या बनवारीलालला पोलिसांनी अडविले.यावेळी त्याच्या गाडीत पत्नी आणि मुलगी होते. ते विरारहून घरी परतत होते. वैद्य यांनी त्याला थांबण्यास सांगितले. मात्र बनवारीलाल याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आव्हाड यांनी गाडीची तपासणी सुरू करताच बनवारीलाल याने हुज्जत घालत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी वैद्य यांच्या गणवेशावरील नेम प्लेटही त्याने ओढली. 'मै राहुल नार्वेकर का कार्यकर्ता हूू.. मुझे कोई हाथ नही लगा सकता. मेरे पिताजी नेवी मे थे', असे म्हणत तो पोलिसांना धक्काबुक्की करत होता. तब्बल अर्धा तास त्यांच्यात हुज्जत सुरु होती. अखेर पहाटेच्या सुमारास त्याला कफपरेड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याची कार पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती कफपरेड पोलिसांनी दिली.