अजित पवार यांची चप्पल चोरीला, राष्ट्रवादीच्या सभेत चोरट्यांची हातसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 03:08 IST2018-01-25T03:07:23+5:302018-01-25T03:08:09+5:30

अजित पवार यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. व्यासपीठावर सर्व पदाधिकारी बसल्यानंतर गर्दी झाली.

 Ajit Pawar's slippers stolen, snooping in NCP meeting | अजित पवार यांची चप्पल चोरीला, राष्ट्रवादीच्या सभेत चोरट्यांची हातसफाई

अजित पवार यांची चप्पल चोरीला, राष्ट्रवादीच्या सभेत चोरट्यांची हातसफाई

पाथरी/ सेलू (जि. परभणी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल संघर्षयात्रेतील पाथरी व सेलू येथील सभेत मंगळवारी चोरट्यांनी हातसाफ केला. ९ जणांचे पाकिट व मोबाइल चोरीस गेले. सेलूत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यासपीठाच्या पायरीजवळ काढून ठेवलेली चप्पलही चोरट्यांनी लांबविली.
सेलू येथील सभेला अजित पवार यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. व्यासपीठावर सर्व पदाधिकारी बसल्यानंतर गर्दी झाली.
या गर्दीचा फायदा घेत अजित पवार यांनी व्यासपीठाच्या पायरीजवळ काढून ठेवलेली चप्पल चोरट्यांनी लांबविली. सभा संपल्यानंतर पवार यांच्या हे लक्षात आले. अखेर त्यांनी एका कार्यकर्त्याची चप्पल घातली व मार्गस्थ झाले.
दरम्यान, पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावरही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मंगळवारी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उमरा येथील शेतकरी संजय बाबासाहेब कोल्हे यांचे १ लाख ६० हजार रुपये, तसेच अन्य काहींची पाकिटे लांबविण्यात आली. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सभेच्या ठिकाणाहून तीन पाकिटमारांना ताब्यात घेतले आहे.

Web Title:  Ajit Pawar's slippers stolen, snooping in NCP meeting