उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल (बुधवारी) बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. अपघातग्रस्त झालेले विमान व्हीएसआर व्हेंचर्सचे होते. २८ जानेवारी रोजी बारामती येथे अपघात झालेले चार्टर्ड विमान, लिअरजेट ४५ होते. हे विमान बिहार विधानसभा निवडणुकीतही वापरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी यांनी २०२५ मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतही हे विमान चालवले होते. या विमानातून भाजपाच्या नेत्यांनी प्रवास केला होता. हे नेते निवडणूक प्रचारासाठी पाटण्याला गेले होते.
या चार्टर फ्लाईटने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह अनेक भाजप नेते पाटण्याला गेले होते. व्हीएसआर व्हेंचर्स ही कंपनी मुझफ्फरपूर येथील रहिवासी कॅप्टन व्हीके सिंह यांच्या मालकीची आहे.
अपघाताच्या दिवशी हे विमान पाटण्याला जाणार होते
२८ जानेवारी रोजी विमान क्रॅश झाले. हे विमान आंध्र प्रदेशातील व्यापारी महेश कुमार रेड्डी यांना घेऊन शमसाबाद विमानतळावरून पाटण्याला जाणार होते. बुधवारी सकाळी १०.३० वाजता ते पाटण्याला उतरणार होते आणि रात्री ९.३० वाजता पाटण्याहून उड्डाण करणार होते. बारामती विमान अपघातानंतर, महेश रेड्डी दुसऱ्या चार्टर्ड विमानाने पाटणा येथे पोहोचले .
Web Summary : The plane involved in Ajit Pawar's Baramati accident was previously used in the Bihar elections. BJP leaders, including Devendra Fadnavis and Eknath Shinde, travelled on it for campaigning. The plane, owned by VSR Ventures, was scheduled to fly to Patna the day it crashed.
Web Summary : अजित पवार की बारामती दुर्घटना में शामिल विमान पहले बिहार चुनाव में इस्तेमाल किया गया था। देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे सहित भाजपा नेताओं ने इस पर चुनाव प्रचार के लिए यात्रा की। वीएसआर वेंचर्स के स्वामित्व वाला यह विमान दुर्घटना वाले दिन पटना जाने वाला था।