शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 12:45 IST

मागील काही काळापासून अजित पवारांबाबत महायुतीत आलबेल नसल्याचं चित्र समोर येत आहे. आरएसएसनेही अजित पवारांमुळे महायुतीचं लोकसभेत नुकसान झालं असं म्हटलं होते. 

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांत होणार आहे. तत्पूर्वी राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच अजित पवार मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीतून १० मिनिटांत बाहेर पडले अशा बातम्या माध्यमांत झळकल्या. त्यावरून विरोधकांनी विविध दावे केलेत. आता संध्याकाळी अजित पवार महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे अजित पवार काय भूमिका मांडतायेत याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज संध्याकाळी ६.३० वाजता माध्यमांशी बोलणार आहेत. या पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या एमसीए लॉन्जमध्ये ही पत्रकार परिषद होईल. त्यामुळे या पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार काय बोलणार याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांबाबत सातत्याने विविध बातम्या समोर येतायेत. त्यात महायुतीत अजित पवारांची कोंडी होत असल्याचा दावाही विरोधक करत आहेत. 

महायुतीकडून अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यात भाजपा सर्वाधिक १५०-१६० जागा लढवण्यावर ठाम आहे तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनेही ८०-९० जागांवर दावा केला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार हे निश्चित नाही. आम्हाला ६०-६५ जागा मिळाव्यात अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. परंतु अद्याप महायुतीचं जागावाटप निश्चित नाही. त्यातच शिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आलेत. समीर भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळांनी त्यांना शुभेच्छा देताना नांदगाव मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिलेत. मात्र याठिकाणी शिंदे गटाचे सुहास कांदे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे जागावाटपावरून महायुतीत काही आलबेल नाही असेच चित्र दिसून येत आहे. 

"महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न"

दरम्यान,  महायुतीच्या सरकारमधील कॅबिनेट बैठकीतील वाद रोजचेच झाले आहेत. हा वाद जनतेच्या हितासाठी नाही, तर स्वत:च्या हितासाठी आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी हा वाद सुरू आहे. तिजोरित पैसा नसताना ८०-८० निर्णय घेतले जातात. यांना कोणाची चिंता आहे. अजित पवार यांना पूर्णपणे बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजित पवार अनेकवेळा वित्त खात्याचे मंत्री राहिले आहेत. त्यांनी त्या विभागात शिस्त पाळण्याचे काम केलंय. पण, अलिकडे शिस्त बिघडवून काम सुरु आहे. आपल्या तिजोरीत पैसे किती आहेत आणि खर्च किती करावा याचं ताळमेळ नाही. पैसे नसताना जीआर काढले गेले, सगळं पाहता महाराष्ट्र कोणत्या दिशेने जात आहे हे दिसतंय, हे राज्याला कंगाल करुन सोडतील. जाता जाता जेवढं मिळेल तेवढे कंगाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच अजितदादांनी काढता पाय घेतला असावा असा दावा काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुती