अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 09:21 IST2025-04-26T09:21:39+5:302025-04-26T09:21:56+5:30

अनेक अधिकारी दहा-दहा वर्षे पुण्यात काढतात. आमचे काहीही म्हणणे नाही. तुम्ही निवृत्त होईपर्यंत येथेच राहा. मात्र, आम्हाला रिझल्ट पाहिजे.

Ajit Pawar warns officials; If they don't do the work they were told to do, Will be Stand at the next meeting | अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

पुणे - आम्ही बेकायदा कामे सांगत नाही. ही रीतसर कामे आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी सांगितलेली कामे पूर्ण केली नाही, तर पुढच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उभे ठेवण्यात येईल, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना भरला.

विधानभवन येथे शुक्रवारी आयोजित जिल्हा नियोजन समितीत ते बोलत होते. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पर्वती मतदारसंघातील पुलाखालील अतिक्रमण काढण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. याबाबत मिसाळ यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. त्यावर पवार यांनी अधिकाऱ्यांना दम भरला. ते म्हणाले, पुण्यात बदली व्हावी यासाठी अधिकारी माझ्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे येतात. या अधिकाऱ्यांना पुण्यात थांबायचे असते. अनेक अधिकारी दहा-दहा वर्षे पुण्यात काढतात. आमचे काहीही म्हणणे नाही. तुम्ही निवृत्त होईपर्यंत येथेच राहा. मात्र, आम्हाला रिझल्ट पाहिजे.

महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले हे कामे करत नसल्याबद्दल शहरातील आमदारांनी तक्रार केली. याबाबत पवार यांनी भोसले यांना इशारा देत, भोसले ३१ मे रोजी निवृत्त होतील. त्याआधी वेगळा निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

Web Title: Ajit Pawar warns officials; If they don't do the work they were told to do, Will be Stand at the next meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.