शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांना ईनमीन चार जागा, त्यातही एक शिंदेंचा, दुसरा भाजपचा उमेदवार आयात; पुढे काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 19:24 IST

Ajit pawar vs Sharad Pawar News: अजित पवारांच्या वाट्याला सध्यातरी ४८ पैकी चार जागा आल्या आहेत. थोरल्या पवारांना टक्कर देण्याच्या नादात अजित पवारांना स्वपक्षातील उमेदवारच सापडलेले नाहीएत, अशी परिस्थिती राष्ट्रवादीवर आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत शरद पवार यांना आव्हान दिलेय खरे परंतु महायुतीत अजितदादांना जागा वाटप करून घेताना फार कमी स्थान मिळाले आहे. महाविकास आघाडीत शरद पवारांनी आपल्या वाट्याला १०  जागा मिळविल्या आहेत. एकूण ४८ पैकी १० ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार आहे, तिथे एखादा उमेदवार सोडता सर्व पक्षातीलच उमेदवार उभे करणार आहेत. परंतु, दुसरीकडे थोरल्या पवारांना टक्कर देण्याच्या नादात अजित पवारांना स्वपक्षातील उमेदवारच सापडलेले नाहीएत.

अजित पवारांच्या वाट्याला सध्यातरी ४८ पैकी चार जागा आल्या आहेत. त्यापैकी बारामतीची जागा अजित दादांची पत्नी सुनेत्रा पवार लढत आहेत. तिकडे रायगडमधून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे लढत आहेत. हे दोन सोडले तर अजित पवारांना उर्वरित दोन मतदारसंघांत शिंदे गट आणि भाजपाकडून उमेदवार आयातच करावे लागले आहेत. 

शरद पवारांना टक्कर देता देता अजित पवारांना महायुतीतही जागा सोडवून घेताना नाकीनऊ आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिरुर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे शरद पवार गटातच राहिल्याने अजित पवारांकडे त्या ठिकाणी उमेदवारच सापडला नाही. यामुळे त्यांना शिवसेनेच्या शिवाजी आढळराव पाटील यांना आयात करावे लागले आहे. पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. 

दुसरीकडे धाराशीवमध्ये अजित पवारांना उमेदवार सापडलेला नाही. तिथे भाजपाचा उमेदवार राष्ट्रवादीकडून लढणार आहे. अशा या जागावाटपात अजित पवारांकडे दोन उमेदवार घरचे आणि दोन बाहेरचे असे बळ आहे. तर नाशिकची जागा अद्याप कोणाला जाणार हे नक्की झालेले नाहीय. तिकडे शिंदेंचे खासदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. तर भुजबळ दिल्लीतून निरोप असल्याचे सांगत फिरत आहेत. अशात ही जागा जर अजितदादांकडे आली तर ठीक नाहीतर राष्ट्रवादीचे २०१९ मध्ये जेवढे खासदार निवडून गेले होते, तेवढ्याच आकड्याच्या जागांवर लढण्याची वेळ अजित पवारांवर येणार आहे. 

टॅग्स :baramati-pcबारामतीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४