शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

"अनिल परबांवर कोणत्या प्रकरणी कारवाई सुरू आहे, माहीत नाही, पण...", अजित पवारांचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 16:24 IST

Ajit Pawar : केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होऊ, नये हीच माफक अपेक्षा आहे, असे म्हणत अजित पवार यांनी भाजप नेते  किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्टवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या कारवाईनंतर केंद्राच्या यंत्रणांना आणि राज्यांच्या यंत्रणांना चौकशी करायचा अधिकार आहे. मात्र काही नेते जे बोलतात तेच घडतंय, त्यानुसार संबंधित नेत्यावर कारवाई होते, असा आरोप अजित पवार यांनी भाजप व केंद्रीय तपास यंत्रणांवर केला आहे. 

गुरुवारी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अनिल परब यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईबाबत अजित पवार म्हणाले, केंद्राच्या यंत्रणांना छापेमारी करण्याचा अधिकार आहे, मागे काहींनी कोणावर कारवाई होणार यावर सुतोवाच केला होता. आणि त्याप्रकारे कारवाई होते, अशाप्रकारे कोणाचा हस्तक्षेप नसावा. मात्र काहीजण आधीच टीम कुठे जाणार, हे सांगतात. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होऊ, नये हीच माफक अपेक्षा आहे, असे म्हणत अजित पवार यांनी भाजप नेते  किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. 

केंद्रीय यंत्रणांचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर सुरू आहे. यंत्रणानी त्यांच्या अधिकारांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत. अनिल परबांवर कोणत्या प्रकरणी कारवाई सुरू आहे, माहित नाही. राजकीय सुडापोटी कारवाई नको. यंत्रणांच्या कामात पारदर्शीपणा पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले. याचबरोबर, अजित पवार म्हणाले की, याआधाही महाविकास आघाडीतील नेत्यांवर अशाप्रकराच्या कारवाई झाल्या आहेत. माझ्याही नातेवाईकांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीची कारवाई केली होती.

यापूर्वी ईडी, सीबीआयकडून कारवाई झाली, कोणाचाही हस्तक्षेप न होता चौकशी व्हायला हवी. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर देखील कारवाई होते, मात्र ही कारवाई पारदर्शक पद्धतीने कारवाई व्हायला हवी, असे अजित पवार यांनी सांगितले. याशिवाय, केंद्राच्या यंत्रणांना आणि राज्यांच्या यंत्रणांना चौकशी करायचा अधिकार आहे. मात्र काही नेते जे बोलतात तेच घडतंय, त्यानुसार संबंधित नेत्यावर कारवाई होते, असा आरोप अजित पवार यांनी भाजप व केंद्रीय तपास यंत्रणांवर केला आहे. 

7 ठिकाणी धाडीपरिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचले आहेत. सीआरपीएफ जवानाच्या तुकड्याही त्यांच्यासोबत आहेत. वांद्रे येथील खासगी घरातही ईडीच्या अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. परब यांच्या संबंधित 7 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. अनिल देशमुख प्रकरणाचे तपास अधिकारी शिवालय बंगल्यात पोहचले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून अनिल परब यांची चौकशी करण्यात येऊ शकते.

दापोलीतील साई रिसॉर्टवर ईडीचा छापादरम्यान, अनिल परब यांचे साई रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची तक्रार भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. सीआरझेडचे उल्लंघन करून हे रिसॉर्ट बांधण्यात आले असल्याचे सोमय्या यांचे म्हणणे होते. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर केंद्राच्या पर्यावरण विभागाचे एक पथक येऊन पाहणी करून गेले. त्यानंतर हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आणि ते पाडण्याचे आदेश देण्यात आले. 

किरीट सोमय्यांनीही साधला निशाणाअनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परब यांनीही तयार राहावे. तसेच अनिल परब यांनी आता आपला बोजा-बिस्तरा भरावा, असा खोचक सल्ला देखील किरीट सोमय्यांनी दिला आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAnil Parabअनिल परब