शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis: 'हे' तर अजित पवारांविरोधातच षडयंत्र; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:57 IST

अजित पवार आणि मोदी मनमोकळेपणाने बोलत होते. हे कदाचित काहींना आवडलं नाही असं फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या देहू येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्यानं राज्यात वाद निर्माण झाला. राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावरून ठिकठिकाणी आंदोलन केले. भाजपाने अजितदादांना भाषण करू न दिल्याने महाराष्ट्राचा अपमान केला अशी टीका राष्ट्रवादी नेत्यांकडून सातत्याने होऊ लागली. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे.

भाजपाच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी अजितदादांची विचारपूस केली. जेव्हा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं(Narendra Modi) नाव भाषणासाठी आले तेव्हा मोदींनी स्वत: अजितदादा बोलणार नाहीत का असं विचारलं. अजितदादांनी तुम्हीच बोला असं म्हटलं. इतका कार्यक्रम चांगला झाल्यानंतर जाणीवपूर्णक या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय. कदाचित अजित पवारांविरोधातच हे षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला. 

तसेच अजित पवार(Ajit Pawar) आणि मोदी मनमोकळेपणाने बोलत होते. हे काहींना आवडलं नाही. त्यामुळे ही अजितदादांविरोधात ही त्यांची खेळी असू शकते. राजकारणात प्रत्येक गोष्टीचे अंदाज लावता येतात. त्यात तथ्य शोधून काढायला हवा. मला जे वाटतं ते मी सांगितले त्यामुळे ते शोधून काढण्याचं काम तुमचं आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे सूचक वक्तव्य केले आहे. 

काँग्रेसचं आंदोलन चुकीचं खासदार राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात आंदोलन करणं चुकीचे आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करण्याचा परवाना देशात कुणाला नाही. चौकशीवेळी तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचं काम काँग्रेस आंदोलनाच्या माध्यमातून करतंय. एजीएलची संपत्ती गांधी कुटुंबाने लाटली असा आरोप त्यांच्यावर आहे असं फडणवीस यांनी म्हटलं. 

MIM ही शिवसेनेची बी टीम MIM ने शिवसेनेला मतदान करून उमेदवाराला निवडून आणलं आहे. MIM शिवसेनेची बी टीम आहे हे सिद्ध झाले आहे. ए टीमला मदत होणारी वक्तव्य जलील करत आहेत. भाजपा कुठल्याही व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. भाजपा पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी जलील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस