‘राष्ट्रवादीवर अजित पवार यांनी दावा सांगू नये’; शालिनीताई पाटील यांचे शरद पवारांना समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 08:12 IST2023-07-10T08:11:43+5:302023-07-10T08:12:08+5:30

शरद पवार यांनी पक्षाबाबत काय करावे ते सांगण्याचा अजित पवार यांना कोणताही नैतिक अधिकार नाही.

'Ajit Pawar should not claim on NCP'; Shalinitai Patil supports Sharad Pawar | ‘राष्ट्रवादीवर अजित पवार यांनी दावा सांगू नये’; शालिनीताई पाटील यांचे शरद पवारांना समर्थन

‘राष्ट्रवादीवर अजित पवार यांनी दावा सांगू नये’; शालिनीताई पाटील यांचे शरद पवारांना समर्थन

कोरेगाव (जि. सातारा)  : ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुशाल स्वतःचा पक्ष काढावा व नवीन चिन्ह घ्यावे. चुलते खासदार शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगू नये,’ असा इशारा माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी दिला. 

कोरेगाव येथील पत्रकारांशी डॉ. पाटील यांनी मुंबई येथून दूरभाष प्रणालीद्वारे संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘शरद पवार यांनी १९९९ मध्ये काँग्रेस सोडत असताना काँग्रेसचे चिन्ह अथवा नाव यावर अधिकार सांगितला नाही. त्यांनी स्वतःहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव घेतले आणि घड्याळ हे स्वतंत्र चिन्ह घेतले. त्यांनी स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्रात पक्ष उभा केला आणि देशभर त्याचे जाळे विणले. शरद पवार यांनी पक्षाबाबत काय करावे ते सांगण्याचा अजित पवार यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. शरद पवार यांनी घेतलेली भूमिका ही अत्यंत योग्य आहे,’ असेही त्या म्हणाल्या.

Web Title: 'Ajit Pawar should not claim on NCP'; Shalinitai Patil supports Sharad Pawar