शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"...तसंच शक्तीपीठ महामार्गाचे होणार, विरोध करु नका"; अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:22 IST

समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्ग होणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं

Ajit Pawar on Shaktipeeth Mahamarg: समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्ग चर्चेत आला आहे. शक्तिपीठ महामार्गाला अनेक जिल्ह्यातून विरोध केला जात आहेत. शक्तिपीठ महामार्गाला  शेतकऱ्यांचा विरोध होत असताना दुसरीकडे या मार्गाचे काम सुरु करण्यात आलं आहे. याविरोधात मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन देखील करण्यात आलं. त्यानतंर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समुद्धी महामार्गाप्रमाणेच शक्तीपीठ महामार्ग होणार असल्याचे म्हटलं. विरोधकांनी विरोधाला विरोध करणं सोडून द्यावं असंही अजित पवार म्हणाले.

राज्यातील १३ जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. मात्र अनेक ठिकाणी त्याला विरोध केला जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही या महामार्गाविरोधात आंदोलन उभं केलं आहे. यावरुनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला. अर्थसंकल्पवरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करु नका असंही म्हटलं.

"पुढे जाण्यासाठी कर्ज  काढण्याचे धाडस दाखवावं लागतं. जर कमी टक्के व्याजाने तु्म्हाला कर्ज मिळालं आणि त्यातून तुम्ही प्रकल्प उभा केला. तो प्रकल्प १ लाख कोटींचा झाला आणि पाच वर्षांनी तो प्रकल्प दोन लाख कोटींवर जातो. अटल सेतूचे पंतप्रधान मोदींनीच भूमीपूजन केलं आणि त्यांनी उद्धाटन केलं. हा प्रकल्प पुढे करायचा असता तर किती लाख कोटींमध्ये गेला असता," असं अजित पवार म्हणाले.

"समृद्धी महामार्गाला काही लोकांनी विरोध केला. आम्हीसुद्धा त्या विरोधामध्ये होतो. आम्हाला शेतकरी म्हणायचे की आपल्याला विरोध करायचा आहे. त्यावेळी जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पैसे चार पटीने पाच पट केले तेव्हा सगळे इकडून तिकडे गेले आणि पैसे घेऊन मोकळे झाले. तसंच शक्तीपीठ महामार्गाचे होणार आहे. त्यामुळे विरोध करु नका. विकास करायचं म्हटलं की तो हवेतून होत नाही. हवेतून रस्ते, शहरं होत नाहीत. हे आपल्याला जमिनीवरच करावं लागतं. त्यामुळे तुम्ही विरोधी पक्षात असला तरी विरोधाला विरोध करणं सोडून द्या. विकासाच्या बाबतीत हातात हात घालून चला. आमचं कुठं चुकत असेल तर आम्हाला दाखवा आम्ही चूक दुरुस्त करु. जो काम करतो तो चुकतो. जो कामच नसेल करत तर चुकेल कसा," असंही अजित पवार यांनी म्हटलं. 

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Ajit Pawarअजित पवार