शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सरळ चाललेलं अजित पवारांचं विमान अचानक पलटी झालं, काहीतरी गडबड झालीये; छगन भुजबळांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 10:25 IST

अजितदादांचे आयुष्य पाहिले तर त्यांच्या जीवनात कायम त्रास भोगावा लागला. त्यांच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. शरद पवारांच्या देखरेखीत ते मोठे झाले असं भुजबळांनी सांगितले.

नाशिक - अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अजित पवारांच्या अकाली जाण्याने राज्यातील राजकीय चित्र बदलले. मात्र या अपघाताबाबत आजही अनेकांच्या मनात विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याची चौकशी डीसीजीएने सुरू केली आहे. मात्र अपघातावर नेते हळूहळू व्यक्त होऊ लागलेत. मंत्री छगन भुजबळ यांनीही विमान अपघातावर भाष्य करत विमान अचानक पलटी कसे झाले, काहीतरी गडबड आहे अशी शंका उपस्थित केली आहे.

नाशिक इथल्या शोकसभेत छगन भुजबळ म्हणाले की, देशात अनेक विमान अपघात झाले. परंतु महाराष्ट्रात अशाप्रकारचा भयानक अपघात पहिल्यांदा झाला. मी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा हे विमान इथं आले कसं काय? हे कळेना. टेबल टॉप होता आणि खाली ५०-६० फूट खाली पडले होते. त्यानंतर जेव्हा मी पार्थला भेटलो त्याच्याकडे एक सीसीटीव्ही फुटेज होते. त्यात ते विमान एकदा घिरटी घालून गेल्यानंतर दुसऱ्यावेळी सरळ असणारे विमान अचानक पलटी मारल्यासारखे दिसते. त्यानंतर काही क्षणात होत्याचे नव्हते होते. चौकशी होईल, मी त्यातला तज्ञ नाही परंतु मी अनेकांशी बोलतोय. त्यात कुठेतरी काही गडबड झालीये, इंजिनमध्ये किंवा रडारमध्ये..आणखी काही असू शकते. चौकशी होईल, त्याची माहितीही येईल. पण जी सोन्यासारखी माणसे गेली ती कशी काय परत येतील असं त्यांनी म्हटलं. 

तर अजितदादांचे आयुष्य पाहिले तर त्यांच्या जीवनात कायम त्रास भोगावा लागला. त्यांच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. शरद पवारांच्या देखरेखीत ते मोठे झाले. अचूक वेळी येणे, काम करणे या अनेक गोष्टींचा ठेवा पवारांकडून अजितदादांकडे आला. लोकांची कामे कशी करावी, शेतकऱ्यांचे प्रश्न, इतरांचे प्रश्न सोडवण्याचे शरद पवारांकडून शिकले. खो-खो, कबड्डी याठिकाणीही अजितदादांचे काम व्यवस्थित सुरू होते. त्यांच्या कामाचा दरारा होता. एखादे काम अधिकाऱ्यांना सांगितले तर नाही म्हणण्याची हिंमत नव्हती. सकाळी ६-७ वाजता कामाला सुरुवात करायचे. स्वच्छता आणि नीटनीटकेपणा त्यांच्याकडे होता. अनेक गोष्टी बारकाईने काम करत होते अशी आठवण छगन भुजबळांनी सांगितली. 

राजीनामा दिल्यानंतर अजितदादा काय बोलले? 

मध्यंतरी काही कारणास्तव मी दादांकडे राजीनामा पाठवून दिला. एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यानंतर अजितदादा थेट मुख्यमंत्र्‍यांच्या घरी गेले आणि तिथून मला फोन केला, आपण फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेऊन काम करतोय. तुम्हाला लोकशाहीत तुमचे विचार मांडण्याचे अधिकार आहेत. तुम्ही ते मांडा पण राजीनाम्याची गोष्ट कशाला करता, राजीनाम्याचे अजिबात बोलायचे नाही असं त्यांनी सांगितले. भाजपासोबत गेलो तरी शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार सोडले नाहीत. शेवटपर्यंत कुठेही ट्रॅक सोडला नाही. ज्या ज्या वेळी प्रसंग उभे राहिले, मग मंत्रिमंडळ असेल किंवा राजकारणात त्या त्या वेळी फुले, शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्याचा अजितदादांचा प्रयत्न होता असंही भुजबळांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's plane suddenly flipped; something went wrong: Bhujbal's statement.

Web Summary : Chhagan Bhujbal suspects foul play in Ajit Pawar's plane crash, questioning its sudden flip. He recalls Pawar's dedication, work ethic, and commitment to social justice, highlighting Pawar's aversion to resignation despite political differences.
टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळAjit Pawarअजित पवारBJPभाजपा