Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघाताला एक महिना होऊन गेला पण अजून चौकशी पूर्ण झालेली नाही, या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाची चौकशी करण्याची मागणी केली होती. दरम्यान, आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात व्हीएसआर कंपनीचे मालक आर.के. सिंह दाखल झाले आहेत.
इस्रायलच्या अण्वस्त्र केंद्रावर इराणची वक्रदृष्टी; तेहरानमधून आली आतापर्यंतची सर्वात मोठी धमकी!
या चौकशीत सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून आर.के. सिंह यांना रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर आर.के. सिंह यांनी आपल्या कंपनीच्या विमानात कोणताही तांत्रिक बिघाड असल्याचा दावा फेटाळून लावला होता. दरम्यान, यानंतर ते पुन्हा कधीच माध्यमांसमोर आले नव्हते.
व्हीएसआर कंपनी आणि केंद्रीय उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांच्यावर रोहित पवार यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. अजित पवार यांच्या विमानाचा वैमानिक ऐनवेळी बदलण्यात आला. या विमानामध्ये गरजेपेक्षा जास्त इंधनाचा साठा करुन ठेवण्यात आला होता, असे आरोप आमदार रोहित पवार यांनी केले होते.
विमान अपघातापूर्वी विमानतळाची रेकी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला महिना उलटल्यानंतर समोर आलेल्या प्राथमिक अहवालावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या अहवालातील त्रुटींवरून थेट नागरी विमान वाहतूक महासंचालनालयावर निशाणा साधला आहे. या अहवालात जाणीवपूर्वक मूलभूत चुका करण्यात आल्याचा दावा करत, डीजीसीए नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? असा जळजळीत सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा आत्मविश्वास कुणामुळे?
रोहित पवार यांनी संबंधित विमान कंपनीच्या (व्हीएसआर) मालकावरही गंभीर आरोप केले आहेत. "आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही, सरकार आमची विमाने वापरत आहे," असा दावा कंपनीचे मालक करत असल्याचे पवारांनी सांगितले. कंपनीला हा आत्मविश्वास नेमका कोठून मिळतो आणि त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे, अशी विचारणा त्यांनी केली. अहवालातील चुका या अपघाताचे गांभीर्य कमी करण्यासाठीच केल्या गेल्या असल्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
Web Summary : VSR company owner R.K. Singh appeared at CID office regarding Ajit Pawar's plane crash investigation after Rohit Pawar's allegations of technical faults and pilot changes. Singh previously denied any malfunctions. Rohit Pawar questions VSR's confidence and potential government protection after the accident report's alleged errors.
Web Summary : अजित पवार के विमान दुर्घटना की जांच के सिलसिले में वीएसआर कंपनी के मालिक आर.के. सिंह रोहित पवार के आरोपों के बाद सीआईडी कार्यालय में पेश हुए। रोहित पवार ने तकनीकी खराबी और पायलट बदलने के आरोप लगाए हैं। सिंह ने पहले किसी भी खराबी से इनकार किया था। रोहित पवार दुर्घटना रिपोर्ट में कथित त्रुटियों के बाद वीएसआर के आत्मविश्वास और संभावित सरकारी सुरक्षा पर सवाल उठाते हैं।