मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण आता राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. "हा केवळ अपघात नसून घातपाताचा संशय आहे," असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला आहे. रोहित पवार यांनी केलेल्या अभ्यासाचे कौतुक करतानाच, राऊत यांनी या प्रकरणात सत्ताधारी पक्षातील काही मंत्र्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा गंभीर आरोप केला.
संजय राऊत यांनी नागरी विमान वाहतूक संचालनालयावर तोफ डागली आहे. "DGCA हे देशातील अत्यंत भ्रष्ट खाते असून अनेक राजकारण्यांचे त्यांना आशीर्वाद आहेत. विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतानाही तो खराब झाल्याचे खोटे सांगितले जात आहे," असा दावा त्यांनी केला. तसेच 'VSR' कंपनी आणि 'DGCA' या दोन्ही संस्थांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारावाराज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूबाबत एफआयआर का दाखल होत नाही? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. "सुनेत्रा पवार यांना आमदारांनी उपमुख्यमंत्री केले असले तरी, त्यांनी पत्नी म्हणून मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजे की गुन्हा दाखल का होत नाही? कोणाचा फोन आल्यावर डीसीपींचे वर्तन बदलले आणि हे प्रकरण दाबलं गेले?" असे आरोप राऊत यांनी केले.
अजित पवारांची भाजपने फसवणूक केली?राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, "अजित पवारांना भाजपमधून बाहेर पडायचे होते, पण भाजपने त्यांची फसवणूक केली. आता एकत्र येण्याची प्रक्रिया संपली आहे." तसेच, मुंबई महानगरपालिकेच्या ३६ हजार कोटींच्या मुदत ठेवीमोडीत काढण्यावरून त्यांनी सरकारवर 'मुंबईची लूट' केल्याचा आरोप केला.
Web Summary : Sanjay Raut alleges foul play in Ajit Pawar's plane crash, demanding an FIR and questioning the DGCA's integrity. He urged Sunetra Pawar to press the CM for answers, suspecting a cover-up and BJP's deception of Ajit Pawar. Raut also accused the government of looting Mumbai.
Web Summary : संजय राउत ने अजित पवार के विमान हादसे में गड़बड़ी का आरोप लगाया और एफआईआर की मांग की। उन्होंने डीजीसीए की सत्यनिष्ठा पर सवाल उठाया। राउत ने सुनेत्रा पवार से सीएम पर जवाब देने का दबाव डालने का आग्रह किया, उन्हें कवर-अप और बीजेपी द्वारा अजित पवार को धोखा देने का संदेह है। राउत ने सरकार पर मुंबई को लूटने का भी आरोप लगाया।