शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांचा आदेश " भगव्या" चा; शरद पवारांची मात्र चुप्पी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 07:00 IST

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने घेतलेली ही भूमिका राजकीय असल्याची टीका सुरु झाली आहे.

ठळक मुद्दे शिवाजी महाराज व भगवा झेंडा हा केवळ शिवसेनेचाच आहे असा समज चुकीचामतांच्या राजकारणांसाठी हा निर्णय घेतला असे बोलणे चुकीचे भारतीय राजकारणातील परिस्थितीचा कल सध्या हिंदुत्वाचा व राष्ट्रवादाचा

पुणे : राष्ट्रवादी कॉग्रेसने पक्षाच्या झेड्यांबरोबरच आता छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेला भगवा झेंडाही पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये फडकावण्याचा आदेश अजित पवारांनी नुकताच दिला. शिवसेना-भाजपाच्या शिवप्रेमाला आणि भगव्या झेंड्याच्या आग्रहाला राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच हिणवले. त्यामुळेच भाजप-शिवसेनेच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या राष्ट्रवादीच्या या नव्या भगवेकरणावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.  ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने घेतलेली ही भूमिका राजकीय असल्याची टीका सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मात्र हा निर्णय ह्यदेर आये, दुरुस्त आये, असा वाटतो आहे.विशेष म्हणजे अजित पवारांनी स्वत: या संदर्भात जाहीर आदेश दिला असला तरी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र या संदर्भात कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते पक्ष सोडून भाजप व शिवसेनेत प्रवेश करु लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी राष्ट्रवादी चा भगवा झेंडाही फडकविण्याचा निर्णय नुकताच जाहिर केला. पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे यांनी '' लोकमत'' ला सांगितले, की शिवाजी महाराज व भगवा झेंडा हा केवळ शिवसेनेचाच आहे असा समज चुकीचा असून, तो भागवत संप्रदायाचा भगवा झेंडा आहे़ त्या भगव्याच्या पाठीमागे एक श्रध्दा व आत्मियता आहे़ याच आत्मयितेने या झेंड्याचा स्विकार केला गेला आहे़ इतक्या दिवस आम्ही हा झेंडा वापरला नाही असे काही नाही़ सध्याच्या परिस्थिती शिवसेनेकडून आम्हीच केवळ या भगव्याचे वारस असल्याचे भासविले जाते ते चुकीचे असून, भगव्याच्या प्रती आदर व छत्रपतींची अस्मिता आमच्यातही ठासून भरली आहे़. केवळ त्याचे प्रदर्शन कधी केले नाही़ सध्याच्या परिस्थितीत सेना व भाजपचा ज्याप्रकारे राजकारण करीत आहे. त्यामुळे त्यांना तोंड देण्यासाठी केवळ मनातील या सुप्त भावना या भगव्या झेंड्याच्या माध्यमातून आम्ही मांडल्या आहेत़.     आमच्या पक्षाच्या दौर्यात, कार्यक्रमात आम्ही या दोन्ही झेंड्याचा वापर सुरू केला असून, यातून राजकीय लाभ घेण्याचा आमचा कुठलाही विचार नाही.लोकांनी यातून काय बोध घ्यायचा तो घ्यावा़ मतांच्या राजकारणांसाठी हा निर्णय घेतला असे बोलणे चुकीचे आहे़. शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही कधीही मते मागणार नाही, असा दावा काकडे यांनी केला़.     ..............बुडत्याला भगव्याचा आधार राष्ट्रवादीला या भूमिकेचा नक्की फायदा होईल, अशी शक्यता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी व्यक्त केली़ ते म्हणाले, भारतीय राजकारणातील परिस्थितीचा कल सध्या हिंदुत्वाचा व राष्ट्रवादाचा आहे़. याच्याशी आपण जुळवून घेतले तर नवीन मतदार आपल्याकडे येतील असे राष्ट्रवादीला वाटत आहे़. भारतीय राजकारणात ''भगवा ध्वज''  म्हणजे हिदुंत्व असा अर्थ आहे़. राष्ट्रवादीने भगवा ध्वज स्विकारला असला तरी तो शिवाजी महाराजांचा आहे़.

राष्ट्रवादी आणि भाजप-सेनेचे भगवे ध्वज वेगळेवेगळे असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत आहे़. हिंदुत्व या प्रकारचा शिवाजी त्यांना नको असून, हिंदू शिवाजी म्हणून हवा आहे, हेच या झेंड्यातून प्रतित होत आहे़. हिंदू चौकटीत आपले वर्तन करणाऱ्या ओबीसी व मराठा यांना जुळविण्यासाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे़. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादी आणि काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणातच नाही, अशी जी परिस्थिती निर्माण झाली होती. ती या निर्णयामुळे बदलेल़ तसेच आ.हे त्या जागा तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील अशी शक्तता पवार यांनी व्यक्त केली़. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसHindutvaहिंदुत्वElectionनिवडणूकSharad Pawarशरद पवार